Header Ads

“जबरी चोरीतील आरोपी अटक, मुद्देमाल जप्त.”


उस्मानाबाद -  संदिप रघुनाथ कचरे (रा. तेर )  हे दि. 20.04.2020 रोजी 22.30 वा. सु. तेर ते वानवाडी रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. दरम्यान वानेवाडी शिवारात एका मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी चार व्यक्तींनी संदीप कचरे यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन त्यांच्या जवळील रोख रक्कम 32,000/- रु., एक मोबाईल फोन, हातातील घड्याळ व 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकुण 64,000/- रु. चा माल जबरीने चोरुन नेल्याने पो.ठा. ढोकी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- महेश घुगे, समाधान वाघमारे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मौजे तेर पारधी पिढी येथे छापा टाकून आरोपी- शाम मच्छिंद्र पवार रा. तेर पारधी पिढी, ता. उस्मानाबाद यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी एक मोबाईल फोन व रोख रक्कम 8,000/- रु.  (असा एकुण किं.अं. 16,000/- रु.) जप्त केला आहे. उर्वरीत तपासकामी आरोपीस पो.ठा. ढोकी येथे हजर केले असुन आरोपीच्या उर्वरीत सहकाऱ्यांचा शोध चालू आहे.

No comments