Header Ads

“सोलर हिटरच्या पट्ट्या चोरीतील आरोपी अटक, मुद्देमाल जप्त.”


स्थानिक गुन्हे शाखा: शासकीय तंत्रनिकेतन मुलांचे वस्तीगृह, उस्मानाबाद येथील वस्तीगृहाच्या ईमारतीची जिन्या जवळील भिंत फोडून- वस्तु भांडारचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 16.03.2020 ते 23.04.2020 या कालावधीत तोडून आतमधील साहित्य (पातेले, परात, हंडे, मिक्सर, कुकर) व छतावरील सोलर वॉटर हिटींग सिस्टीमचे साहित्य (एकुण किं.अं. 4,52,336/-रु.) चोरुन नेल्यावरुन पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पोनि  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- किसन जगताप, प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, गव्हाणे, पोकॉ- मरलापल्ले, महिला पोकॉ- वैशाली सोनवणे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी- किरण राम लोंढे उर्फ कृष्णा रा. जुना बस डेपो पारधी पिढी, उस्मानाबाद यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी सोलर च्या तांब्या धातुच्या 5 प्लेटा (एकुण किं.अं. 1,25,000/- रु.) जप्त करुन आरोपीस पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे हजर केले असुन गुन्ह्यातील उर्वरीत आरोपींचा शोध घेण्यास चालू आहे.  
चोरी.”
पोलीस ठाणे, परंडा: लक्ष्मीबाई मधुकर कांबळे रा. अरणगांव, ता. परंडा यांचे घर उघडे असल्याचे पाहुन अज्ञात चोरट्याने दि. 12.04.2020 रोजी 10.00 ते 12.00 वा. सु. घरात घुसून घरातील सुटकेस मध्ये ठेवलेले 10,000/- रु. चोरुन नेले असल्याचे सुटकेस मध्ये पाहणी केले असता त्यांना समजले. अशा मजकुराच्या लक्ष्मीबाई कांबळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 25.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, येरमाळा: गणपती काशीनाथ पेंडपाले रा. मांडवा, ता. वाशी यांना दि. 23.04.2020 रोजी 15.30 वा. सु. मौजे बावी येथील शेतात शेत गट क्र. 415 च्या बांधावर पाईप टाकल्याच्या कारणावरुन भाउबंद- संतोष पेंडपाले, जगदिश पेंडपाले, सिंधुबाई पेंडपाले यांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच खोऱ्या डोक्यात मारुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गणपती पेंडपाले यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 24.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: लखन इरेशाप्पा आराळे यांच्यासह अन्‍ 14 व्यक्ती सर्व रा. धनगरवाडी, ता. तुळजापूर यांनी दि. 22.04.2020 रोजी 08.00 वा. सु. मौजे धनगरवाडी येथे बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावातीलच- गणेश मनोहर दुधभाते व अन्य 2 व्यक्तींना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गणेश दुधभाते यांच्या फिर्यादीवरुन वरील सर्वांविरुध्द गुन्हा दि. 24.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, शिराढोण: सुभाष त्रिंबक पवार रा. करंजकल्ला, ता. कळंब यांच्यास‍ह कुटूंबीयांना दि. 21.04.2020 रोजी 07.15 वा. सु. करंजकल्ला येथील सार्वजनिक पाण्याचे टाकीवर पाणी भरण्याच्या कारणावरुन गावातीलच- जालिंदर पंढरीनाथ कवडे, प्रकाश कवडे, आकाश कवडे, शोभा कवडे यांनी शिवीगाळ करुन, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुभाष पवार यंच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 24.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: बालाजी येल्लाळ, महेश येल्लाळ, अंगद येल्लाळ तीघे रा. कात्री, ता. तुळजापूर हे दि. 24.04.2020 रोजी 20.30 वा. सु. कात्री येथे बुध्दभुषण चंद्रकांत सोनवणे यांच्या नातेवाईकास मारहाण करत होते. दरम्यान भांडणे सोडवण्यास गेलेल्या बध्दभुषण सोनवणे यांना वरील तीघांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, फावड्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बुध्दभुषण सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 24.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

रस्ता अपघात.
पोलीस ठाणे, तामलवाडी: काकासाहेब मारुती जुजारे रा. राजुरी, ता. सांगोला, जि. सोलापूर याने ट्रक क्र. एम.एच. 45 एएफ 4478 हा दि. 24.04.2020 रोजी 22.35 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग 52 वर तामलवाडी शिवारातील कठारे मिल समोर निष्काळजीपणे चालवल्याने अनियंत्रित होउन रस्त्या बाजूस असलेल्या पोलीस चेकपोस्टच्या अडथळ्यांना (बॅरिकेडस) व तंबूला धडकला. यात तंबु व ट्रकचे नुकसान होउन तो स्वत: जखमी झाला. अशा मजकुराच्या सपोफौ- वालचंद राठोड यांनी सरकार तर्फे दिलेल्या तक्रारीवरुन वरील ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दि. 25.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


No comments