Header Ads

“चोरीच्या मोटारसायकलसह संशयीत ताब्यात.”स्थानिक गुन्हे शाखा (LCB): स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख, सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- घायाळ, पोहेकॉ- झोंबाडे, माळी, रोकडे, कवडे, पोना- वाघमारे यांचे पथक दि. 07.04.2020 रोजी रात्र गस्तीस होते. गस्ती दरम्यान बेंबळी पो.ठा. हद्दीतील अनसुरडा येथे श्याम भारत माने, वय 26 वर्षे, रा. अनसुरडा, ता. उस्मानाबाद हा होंडा शाईन मोटारसायकलसह संशयीतरित्याआढळुन आला. त्याच्या ताब्यातील मो.सा. ही चोरीची असुन त्या संबंधाने पो.ठा. अक्कलकोट (दक्षिण) येथे गु.र.क्र. 63/2020 भा.दं.वि. कलम-379 प्रमाणे दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास मो.सा. सह ताब्यात घेउन पुढील तपासकामी बेंबळी पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.  

मारहाण, 2 गुन्हे दाखल.”
पोलीस ठाणे, कळंब: तानाजी बाबुराव पवार रा. डिकसळ, ता. कळंब यांना दि. 07.04.2020 रोजी 21.30 वा. सु. त्यांच्या कॉलनीत पुणे- मुंबई येथून आलेल्या व्यक्ती दिसल्याने त्यांनी त्या व्यक्तींना तुम्ही दवाखण्यात जाउन तपासणी करुन घ्या, आम्हाला तुमच्या पासून कोरोना विषाणुचा संसर्ग होईल. असे सांगीतल्याच्या कारणावरुन तानाजी पवार यांना कॉलनीतील बालाजी वसंत काळे यांनी  तु कोन आम्हाला सांगणारा? असे धमकावून, शिवीगाळ करुन, दगड डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या तानाजी पवार यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 07.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, आंबी: सावित्रा उलन पवार व त्यांची मुलगी- कोमल, मुलगा- शिवाजी रा. पाथ्रुड, ता. भुम यांना दि. 06.04.2020 रोजी 17.00 वा. सु. मौजे हंगेवाडी येथे आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन तुळशिदास मिसऱ्या काळे, कृष्णा तुळशिराम काळे, नमनबाई काळे, मंगल शिंदे, सोनारी काळे, दिदी भोसले सर्व रा. हंगेवाडी, ता. भुम यांनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सावित्रा पवार यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 07.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, बेंबळी: गोविंद हजारे रा. बेंबळी, ता.उस्मानाबाद हे त्यांच्या राहत्या घरात दि. 08.04.2020 रोजी रात्री 02.30 वा. झोपलेले असतांना अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कोंडा वाकवून कुटूंब सदस्य झोपलेले असलेल्या खोलीतील पर्स ज्यात 36 ग्रॅम वजनाचे सोने दागिने (किं.अं. 73,000/- रु.) चोरुन नेले. अशा मजकुराच्या गोविंद हजारे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यावरिुध्द गुन्हा दि. 08.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments