Header Ads

“संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, 8 गुन्हे दाखल.”उस्मानाबाद जिल्हा:  उस्मानाबाद जिल्ह्यात दि.07.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)शेषेराव बाळु चौगुले रा. बोरगाव (राजे), ता. उस्मानाबाद, तर मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अवज्ञा करुन तुळजापूर  येथील पाटबंधारे कार्यालया समोर सार्वजनिक ठिकाणी हातात काठ्या घेउन आपापसात भांडणे करणारे 2)राजेंद्र शाहुराज वाघमारे 3)अभिलाश अनंद बेळंबे दाघे रा. पापनास, तुळजापूर (तिर्थ) या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 160, 188, 269 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 07.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
तर मा.जिल्हाधिकारी यांनी किराणा दुकाने चालू ठेवण्याची निश्चित केलेली वेळ 07.00 ते 11.00 वा. पर्यंत असतांनाही  दि.08.04.2020 रोजी भोत्रा, ता. परंडा येथे किराणा दुकान उघडे ठेवणारे चौघे जन 1)राम सुदाम लोंढे रा. भोत्रा, ता. परंडा 2)विनोद घळके रा. पिंपरी (आ.), ता. परंडा 3)हर्षद खासे रा. कात्राबाद, ता. परंडा 4)राजु पठाण रा. निजामपुरा, ता.परंडा, तर बडगांव (सि.) येथे धाबा उघडा ठेवणारे 5) बापुराव मते रा. वडगांव (सि.), ता.उस्मानाबाद, तर  सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 6)असिफ ईनामदार 7)सोमनाथ आगलावे दोघे रा. येरमाळा, ता.कळंब व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये स्वतंत्र 6 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 07.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारी 214 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश झाला असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जपतीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार काल दि. 07.04.2020 रोजी अशी एकुण 214 वाहने ताब्यात घेतली आहेत.
तर आज दि. 08.04.2020 रोजी  एकुण 78 वाहने  ताब्यात घेतली असुन उर्वरीत कारवाई सुरु आहे.

No comments