Header Ads

“मारहाण, 5 गुन्हे दाखल.”पोलीस ठाणे, उमरगा: दि. 20.04.2020 रोजी 09.30 वा. सु. मौजे बलसुर तांडा, ता. उमरगा येथे गुलाबदास नंदु चव्हाण व अन्य 4 सहकारी यांचा बलसुर तांडा येथील शेतातील सामाईक विहीरीवरील विद्युत पंप चालु- बंद करण्याच्या कारणावरुन भाउबंद- बब्रुवान नंदु चव्हाण व अन्य 4 व्यक्ती यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी बेकायदेशीर जमाव जमवून परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, सळई, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. उमरगा येथे दि. 21.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, कळंब: ल्रिबराज विश्वनाथ ओव्हाळ, जयश्री ओव्हळ, राहुल ओव्हळ सर्व रा. मोहा, ता. कळंब यांनी दि. 20.04.2020 रोजी 20.00 वा. सु. त्यांच्या घरा समोर पाण्याचा लोंढा आल्याच्या कारणावरून शेजारील- वच्छलाबाई आबासाहेब भालेराव यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, विटाने मारहाण करुन जखमी केले. भांडण सोडवण्यास आलेल्या आबासाहेब भालेराव यांच्या डोक्यात लिंबराज ओव्हळ याने कुऱ्हाड मारुन जखमी केल्याने त्यांना औषधोपचारकामी सरकारी दवाखाना, कळंब येथे दाखल केले आहे. अशा मजकुराच्या वच्छलाबाई भालेराव यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 21.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: गुरुबाई महादेव रक्षे रा. घट्टेवाडी, ता. तुळजापूर या दि. 21.04.2020 रोजी 12.00 वा. सु. घट्टेवाडी येथील त्यांच्या शेतात पायी जात होत्या. यावेळी गावातीलच- सहदेव लकाप्पा घट्टे, सुवर्णा सहदेव घट्टे यांनी  तुझ्या मुलाने आमच्या विरुध्द केलेली केस मागे घे, नाहीतर तुझे घरच संपवितो. असे गरुबाई रक्षे यांना धमकावून, शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या गुरुबाई रक्षे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 21.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: दिलीप अर्जुन गंभीरे रा. राजुरी, ता. परंडा यांनी आपल्या वडीलांना मारहाण केल्याचा जाब भाऊबंद- आण्णा महादेव गंभीरे, बालाजी गंभीरे यांना विचरला असता दि. 20.04.2020 रोजी 04.30 वा. सु. राजुरी येथील टाकळी रोडवर  त्या दोघांनी तुम्हाला एकाला तरी संपवितो. असे दिलीप गंभीरे यांना धमकावून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दिलीप गंभीरे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 21.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

चोरीचा प्रयत्न.”
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (शहर): संजय दत्तात्रय पाटील रा. मारवाडी गल्ली, उस्मानाबाद यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 19.04.2020 रोजी मध्य रात्री तोडून घरातील -कपाटातील सामान अस्ताव्यस्त टाकून चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या संजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 21.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments