Header Ads

“लॉकडाउन: छुप्या मार्गाने, विनापरवाना जिल्हा प्रवेश,4 गुन्हे दाखल.”उमरगा: उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व सिमा विनापरवाना प्रवासास बंद केल्या आहेत. तरीही पोलीस नाकाबंदी टाळून छुप्या मार्गाने 1)महेबुब नालसाहेब मातोळे रा. जकेकुर, ता. उमरगा हा दि. 15.04.2020 रोजी बाहेर जिल्ह्यातून मौजे जकेकूर येथे आला. तर 2)कल्पना गुरुनाथ बनशेट्टे रा. हागलुर, ता. आळंद, जि. गुलबर्गा, राज्य- कर्नाटक या दि. 16.04.2020 रोजी हागलुर येथून मौजे कोळसूर (गु.), ता. उमरगा येथे आल्या. तर, 3)प्रशांत मल्लिकार्जुन लिंबाळे 4)माय लिंबाळे दोघे रा. एकुरगा, ता. उमरगा हे दोघे दि. 18.04.2020 रोजी पुणे येथून एकुरगा येथे आले. तसेच 5)श्रीनिवास शिरगुरे 6)विद्यावती म्हेत्रे 7)ऋतुजा म्हेत्रे 8)वैष्णवी म्हेत्रे 9)वेदांत म्हेत्रे 10)दिपक कासावाडे 11)रविराज माळी 12)प्रशांत माळी 13)सतिश जाधव सर्व रा. उमरगा 14)दिपक वामणे रा. आलुर, ता. उमरगा हे सर्व दि. 22.04.2020 ते 23.04.2020 या कालावधीत बाहेर जिल्ह्यातुन उमरगा शहरात आले.
                 अशा रितीने वरील सर्वांनी मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. अशा मजकुराच्या संबंधीत गावच्या पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 अन्वये स्वतंत्र 4 गुन्हे दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

मारहाण.”
पोलीस ठाणे, नळदुर्ग: नामदेव गुंडाप्पा घोडके, मनिषा घोडके, प्रभावती घोडके तीघे रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर हे दि. 25.04.2020 रोजी 14.00 वा. सु. मौजे होर्टी येथील त्यांच्या शेतात सामाईक बांधावरील झाड यंत्राच्या सहाय्याने काढत होते. यावेळी भाउबंद- राम घोडके यांच्यासह पत्नी- लक्ष्मीबाई घोडके यांनी त्यांना सामाईक बांधावरील झाड तोडण्याचे कारण विचारले. त्यावर वरील तीघांनी राम घोडके व लक्ष्मीबाई यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या लक्ष्मीबाई घोडके यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 26.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: माया सतिश सोलनकर रा. कोरगांववाडी, ता. उमरगा यांनी सासरच्या मालमत्तेतील हिस्सा मिळण्यासाठी केलेला दावा न्यायालयात प्रलंबीत आहे. असे असतांनाही दि. 26.04.2020 रोजी 18.00 वा. सु. सोलनकर विटभट्टी, कोरगांववाडी येथील विटा व साहित्य सासरचे नातलग- घेउन जाण्याच्या प्रयत्नात होते. यावर माया सोलनकर यांनी ‘न्यायालयाचा निकाल लागे पर्यंत विटा परस्पर नेउ नका.’ असे सासरच्या लोकांना सुनावले. यावर चिडुन जाउन सासरकडील नातेवाईक- शिवाजी सोलनकर, प्रभाबाई सोलनकर, तानाजी सोलनकर, वनमाला सोलनकर सर्व रा. कोरगांववाडी यांनी माया यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माया यांचा भाउ भांडण सोडवण्यास आला असता त्यास देखील मारहाण केली. अशा मजकुराच्या माया सोलनकर यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 26.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

 “चोरी.”
पोलीस ठाणे, ढोकी: परमेश्वर मोहन सगर रा. तावरजखेडा, ता. उस्मानाबाद यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने दि. 26.04.2020 रोजी 00.30 ते 01.30 वा. सु. प्रवेश करुन घरामधील कपाटातील 72 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, चांदीचे तीन चैन व रोख रक्कम 75,000/- रु. (दागिन्यांसह एकुण 2,95,500/- रु.) चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या परमेश्वर सगर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 26.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, बेंबळी: बेबी हिम्मतखॉ पठाण रा. रामनगर, बेंबळी, ता. उस्मानाबाद या दि. 26.04.2020 रोजी 08.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घराला कुलूप लाउन शेतात गेल्या. नंतर 14.00 वा. घरी परत आल्या असता दरम्यान च्या काळात घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरातील  कपाटातील सोन्याचे दागिने किं.अं. 52,000/- रु. चे चोरुन नेल्याचे त्यांना दिसले. अशा मजकुराच्या बेबी पठाण यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 26.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: सुर्यकांत अरुण काळे रा. भंडारवाडी, ता. उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 27.04.2020 रोजी 03.00 वा. सु. तोडून घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम 15,000/- रु. व एक विवो मोबाईल फोन (एकुण 29,000/- रु.) चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सुर्यकांत काळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

1 comment

Unknown said...

पहले नव मुसलमान डेणे मॅगे विशेष अजेंडा?