Header Ads

लपुन-छपून आडवाटेने जिल्ह्यात प्रवेश केला, गुन्हा दाखल


 उमरगा: रोहीणी संतोष पुजारी, वैष्णवी संतोष पुजारी, संतोष करबस पुजारी, विठ्ठल शिवाजी दणाणे, नितीन शिवाजी दणाणे, लक्ष्मी शिवाजी दणाणे, बालाजी बळीराम चव्हाण, रवी विठ्ठल शिंदे, निवृत्ती अनिल जाधव, आकाश मारुती वाकुडकर सर्व रा. उमरगा हे सर्व मुंबई, पुणे, सोलापूर, अमरावती, कर्नाटक या ठिकाणाहून दि. 17.04.2020 ते 21.04.2020 या कालावधीत जिल्ह्याची सिमा बंद असतांना पोलीस नाकाबंदी टाळून आडवाटेने त्यांनी उमरगा शहरात प्रवेश केला. अशा प्रकारे त्यांनी लॉकडाउन असतांना कोरोना विषाणु चा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना- आदेशांचे उल्लंघन करुन, स्वत:ची व इतरांची सुरक्षीतता धोक्यात आणण्याची कृती केली. अशा मजकुराच्या बालासाहेब कानडे (नगरपरिषद कर्मचारी) यांच्या फिर्यादीवरुन वरील संबंधीतांवर गुन्हा दि. 22.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

लॉकडाउन काळात एकत्र जमून वाढदिवस साजरा, बांधकाम चालू -2 गुन्हे दाखल.
 उस्मानाबाद जिल्ह्यात दि.22.04.2020 रोजी उस्मानाबाद येथे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन बांधकाम करणारे 1)निजामुद्दीन जाउद्दीन शेख 2)मोमीन लतीफ शेख 3)अमीर रमजान शेख 4)रिहान अजीमोद्दीन सय्यद सर्व रा. उस्मानाबाद, यांच्याविरुध्द तसेच कोरोना विषाणु चा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना- आदेशांचे उल्लंघन करुन, एकमेकांत सुरक्षीत अंतर न ठेवता, नाका- तोंडास मास्क न लावता धारेवाल कॉम्पलेक्स, तुळजापूर येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले 5)जोतीराम पोपट जाधव रा. धारेवाल कॉम्पलेक्स, तुळजापूर व अन्य 5 व्यक्ती या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 271 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 22.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 53 वाहने जप्त.”
 लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्‍तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 22.04.2020 रोजी तुळजापूर- 14, तामलवाडी- 1, शिराढोण- 1, कळंब- 8, परंडा- 4, शहर वाहतुक शाखा- 25, अशी एकुण 53 वाहने ताब्यात घेतली आहेत.

लॉकडाउन: दि. 22.4.20 रोजी 844  पोलीस कारवायांत 2,31,400/-रु. दंड वसुल.
लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश झाला आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: रस्ता, बाजार, ईमारती इत्यादी ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर एकुण 515 कारवाया करुन 70,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी नाक- तोंड न झाकणे (मास्क न वापरणे): 147 कारवाया करुन 93,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: किराणा- भाजी दुकाने, जिवनावश्यक वस्तु दुकाने इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 133 कारवाया करुन 33,900/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
4)जिवनावश्यक वस्तु दुकाना समोर दर पत्रक न लावणे: किराणा दुकाना समोर दर पत्रक न लावणाऱ्या दुकान चालकांविरुध्द 49 कारवाया करुन 34,000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
            तर आज रोजी याच प्रकरणांत विविध कारवाया सुरु आहेत.

No comments