Header Ads

“वैद्यकीय व्यावसायीक- कर्मचाऱ्यांकरीता उस्मानाबाद पोलीस दलाची स्वतंत्र हेल्पलाईन.”


पोलीस मुख्यालय: कोविड- 19 या साथीच्या व संसर्गजन्य रोगा विरुध्द देशातील वैद्यकीय अधिकारी- व्यावसायीक, कर्मचारी हे निष्ठेने अहोरात्र लढा देत आहेत. असे असतांनाही समाज कंटकांकडून वैद्यकीय क्षेत्राच्या विरोधात काही अप्रिय, हिंसात्मक घटना घडल्या आहेत. अशा घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्राचे मनोबल खच्ची होउ नये, त्यांच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण होउ नये म्हणुन उस्मानाबाद पोलीस दलाने वैद्यकीय क्षेत्राकरीता स्वतंत्र हेल्पलाईन सुरु केली आहे. या कामी उस्मानाबाद जिल्हा स्तरावर श्री. दगुभाई शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, व्हाट्सॲप क्र.- 9923128673, नियंत्रण कक्ष- व्हाट्सॲप क्र. 7588527620 यांना समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) नेमण्यात आले आहे.
            कोरोना-कोविड- 19 च्या निराकरणा संदर्भात निवारा गृह, क्वारंटाईन होम, हॉस्पीटल, कोविड बाधीत रुग्ण शोधणे इत्यादी संबंधी कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी- व्यावसायीक, कर्मचारी यांना त्या संबंधाने कार्य करतांना काही त्रास, विरोध होत असल्यास त्यांनी वरील नमुद नोडल अधिकारी यांना संपर्क साधावा. असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी केले आहे.

लॉकडाउन: दि. 21.4.20 रोजी 1,186  पोलीस कारवायांत 3,20,900/-रु. दंड वसुल.
 लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश झाला आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: रस्ता, बाजार, ईमारती इत्यादी ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर एकुण 472 कारवाया करुन 94,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी नाक- तोंड न झाकणे (मास्क न वापरणे): 214 कारवाया करुन 1,07,400/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: किराणा- भाजी दुकाने, जिवनावश्यक वस्तु दुकाने इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 491 कारवाया करुन 1,10,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
4)जिवनावश्यक वस्तु दुकाना समोर दर पत्रक न लावणे: किराणा दुकाना समोर दर पत्रक न लावणाऱ्या दुकान चालकांविरुध्द 9 कारवाया करुन 9,000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
            तर आज रोजी याच प्रकरणांत विविध कारवाया सुरु आहेत.

मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, उघडी दुकाने, बांधकाम चालू -3 गुन्हे दाखल.

उस्मानाबाद जिल्ह्यात दि.21.04.2020 रोजी मौजे जवळा (खु.) येथे सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल अशा निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)भैरु ग्यानदेव हांडीबाग रा. जवळा (खु.), ता. कळंब,  आढळले, तर मा.जिल्हाधिकारी यांनी किराणा दुकाने चालू ठेवण्याची निश्चित केलेली वेळ 07.00 ते 11.00 वा. पर्यंत असतांनाही कळंब येथे किराणा दुकान उघडे ठेवणारे 2)रमेश गोविंद नांदुरकर रा. कळंब, तसेच उमरगा येथे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन बांधकाम करणारे 3)मजीद अब्दुल लदाब रा. कार्ले प्लॉट, उमरगा या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 21.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 94 वाहने जप्त.”

 लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्‍तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 21.04.2020 रोजी उस्मानाबाद (शहर)- 10, तुळजापूर- 15, नळदुर्ग- 1, शिराढोण- 1, कळंब- 47, शहर वाहतुक शाखा- 20, अशी एकुण 94 वाहने ताब्यात घेतली आहेत.

No comments