Header Ads

“चोरीस गेलेल्या मोबाईल फोनसह आरोपी ताब्यात.”


स्थानिक गुन्हे शाखा (LCB): बाळासाहेब दत्तु लाकाळ रा. पळसप, ता.उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन कपाटातील रोख 35,000/- रु., तीन मोबाईल फोन, दोन मनगटी घड्याळ एकत्रीत किं.अं 16,800/- रु. च असा एकुण 51,800/- रु. चा माल चोरीस गेल्यावरुन पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 95/2020 भा.द.वि. कलम- 380 अन्वये दाखल आहे.
            सदर गुन्हा स्था.गु.शा. च्या पथकाने यापुर्वीच उघडकीस आणला असुन उर्वरीत तपासात स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. शेख यांच्या पथकातील पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- जगताप, थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- मरलापल्ले यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी- अविनाश दिलीप भोसले रा. पाटोदा फाटा यास दि. 21.04.2020 रोजी ताब्यात घेउन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला विवो मोबाईल फोन (कि.अं.8,000/-) जप्त कला आहे. उर्वरीत तपासकामी त्यास संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात देण्यात आले.

मारहाण, 3 गुन्हे दाखल.”
पोलीस ठाणे, वाशी: दि. 20.04.2020 रोजी 11.20 ते 19.30 वा. चे दरम्यान पांढरेवाडी, ता.भुम येथे रावसाहेब आनंदराव हुंबे व अन्य 12 सहकारी यांचा शेतजमीनीच्या कारणावरुन भाऊसाहेब जिवन हुंबे व अन्य 12 व्यक्ती यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी बेकायदेशीर जमाव जमवून परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाड, फावडे, काठीने, दगड- विटाने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. वाशी येथे दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
पोलीस ठाणे, आनंदनगर: तुकाराम कदम, वर्षा कदम, प्रतिक कदम तीघे रा. शाहुनगर, उस्मानाबाद यांनी आपल्या मुलाला दमदाटी केल्याच्या राग मनात धरुन कॉलनीतीलच बबीता बिभीषण गव्हाणे यांना दि. 17.04.2020 रोजी 18.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घरा समोर शिवीगाळ करुन, धक्काबुक्की केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात बबीता गव्हाणे यांचा हात फॅक्चर झाला आहे. अशा मजकुराच्या बबीता गव्हाणे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
चोरी.”
पोलीस ठाणे, उमरगा: मौजे तुरोरी, ता. उमरगा येथील ‘राज बियर बार’  च्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 20.04.2020 रोजी मध्यरात्री तोडून आत मधील वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी दारुचे 50 बॉक्स (एकुण किं.अं. 4,00,000/-रु.) चोरुन नेले आहेत.
तर, त्याच दिवशी मौजे माडज, ता. उमरगा येथील हॉटेल & बियर शॉपी च्या खिडकीतून आत प्रवेश करुन बियर शॉपीच्या गुदामाचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून गुदामातील वेगवेगळ्या कपनीच्या विदेशी दारुच्या 786 बाटल्या (एकुण किं.अं. 1,02,542/-रु.) चोरुन नेल्या आहेत.  अशा मजकुराच्या बियर बार मालक अनुक्रमे- पृथ्वीराज प्रदीप जाधव रा. तुरोरी, ता. उमरगा व प्रशांत राजेंद्र गायकवाड रा. माडज, ता. उमरगा यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द पो.ठा. उमरगा येथे स्वतंत्र 2 गुन्हे दि. 20.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments