Header Ads

चोरीच्या सोयाबीनसह 3 संशयीत ताब्यात


उस्मानाबाद -  नागनाथ दत्तु कोळगे रा. उस्मानाबाद यांनी त्यांच्या घरा शेजारील पत्रा शेडमध्ये ठेवलेल्या 70 सोयाबीन पोत्यांपैकी 18 पोती (किं.अं. 40,000/-रु.) दि. 20.12.2019 रोजी रात्री अज्ञात चोरट्याने शेडजा दरवाजा उघडून चोरून नेली होती. यावरुन पो.ठा. आनंदनगर येथे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्यात स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, पोना- महेश घुगे, समाधान वाघमारे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 18.04.2020 रोजी मौजे मेडसिंगा शिवारात छापा टाकून आरोपी- 1)दादा रामा काळे रा. सांजा पारधी पिढी 2)रावसाहेब चंदर काळे रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद 3)नारायण दत्तु गवळी रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण माल जप्त करुन पुढील तपासकामी आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.  

लॉकडाउन: दि. 18.4.20 रोजी 397  पोलीस कारवायांत 1,56,800/-रु. दंड वसुल.

 लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश झाला आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: रस्ता, बाजार, ईमारती इत्यादी ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर एकुण 182 कारवाया करुन 36,100/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी नाक- तोंड न झाकणे (मास्क न वापरणे): 142 कारवाया करुन 71,000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: किराणा- भाजी दुकाने, जिवनावश्यक वस्तु दुकाने इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 38 कारवाया करुन 15,200/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
4)जिवनावश्यक वस्तु दुकाना समोर दर पत्रक न लावणे: किराणा दुकाना समोर दर पत्रक न लावणाऱ्या दुकान चालकांविरुध्द 35 कारवाया करुन 34,500/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.
            तर आज रोजी याच प्रकरणांत विविध कारवाया सुरु आहेत.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 63 वाहने जप्त.”
लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्‍तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 18.04.2020 रोजी तुळजापूर- 20, उस्मानाबाद (शहर)- 8, शहर वाहतुक शाखा- 35, अशी एकुण 63 वाहने ताब्यात घेतली आहेत.


संचारबंदीत प्रवाशी वाहतूक केली, गुन्हा दाखल.”
 ढोकी: परशूराम दुर्गाप्पा देवकर रा. कस्तुरी मार्केट, सहाणे चौक, पुणे हा दि. 17.04.2020 रोजी 16.00 वा. सु. त्याच्या इर्टीगा कार मध्ये पुणे येथील प्रवाशी घेउन जात होता. पोलीस नाकाबंदीस टाळण्यासाठी तो आडवाटेने प्रवास करत असतांना पो.ठा. ढोकी यांच्या पथकास मौजे जागजी शिवारात आढळला. यावरुन वरील कार चालकाविरुध्द भा.दं.वि. कलम-188, 269 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 सह, म.पो.का. कायदा कलम- 135 सह, मो.वा.का. कलम-66/192 अन्वये गुन्हा दि. 19.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments