Header Ads

पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल उस्मानाबाद -  अनुराधा रिटे व चव्हाण या दोन महिला पोलीस कर्मचारी लॉकडाउन काळात दि. 15.04.2020 रोजी 14.00 वा. सु. युको बँक, शाखा उस्मानाबाद समोर बंदोबस्तास होत्या. यावेळी बँके समोर गणेश चांगदेव गाडे रा. गणेशनगर, उस्मानाबाद हा बँक ग्राहकांची गर्दी करुन उभा होता. तशी गर्दी न करण्या बद्दल व नाका – तोंडास मास्क बांधण्याबद्दल महिला पोलीसांनी त्यास सुनावले. यावर त्याने त्या महिला पोलीसांना विरोध करुन धक्काबुक्की, शिवीगाळ करुन ढकलून दिले. अशा प्रकारे त्याने पोलीसांच्या (लोकसेवकाच्या) शासकीय कर्तव्यात जाणीव पुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन त्याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 353, 188, 506 सह, महाराष्ट्र कोविड- 19 नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 16.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

आदेशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हा दाखल

 उस्मानाबाद जिल्ह्यात दि.16.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करुन मौजे राजुरी येथे विनाकारण फिरणारे 1)दादा मुक्ताजी लटके 2)बध्दीवान मुक्ताजी लटके दोघे रा. राजुरी, ता. परंडा, तर मौजे निलेगाव येथे सार्वजनिक ठिकाणी बंद दुकाना समोर विनाकारण बसलेले 3)टिपु मुस्ताक इनामदार 4)रईस मुस्ताक इनामदार 5)मुस्ताक गुलाब इनामदार तीघे रा. निलेगाव, ता.तुळजापूर या व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 16.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 79 वाहने जप्त

 लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्‍तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 15.04.2020 रोजी उस्मानाबाद (शहर)- 23, कळंब- 7, येरमाळा- 1, शहर वाहतुक शाखा- 48, अशी एकुण 79 वाहने ताब्यात घेतली आहेत.

No comments