Header Ads

“प्रशासनास माहिती न देता बाहेर जिल्ह्यातील 9 व्यक्तींना आश्रय दिला, गुन्हा दाखल.”पोलीस ठाणे, उस्मानाबाद (शहर): अमिरखान साबीरखान पठाण रा. टिपु सुलतान चौक, उस्मानाबाद यांनी दि. 14.04.2020 रोजी त्यांच्या पत्रा शेड मध्ये बीड येथील 8 व नांदेड येथील 1 अशा 9 मजुरांना एकत्र ठेवले. त्यांनी आश्रय दिलेल्या मजुरांची माहिती प्रशासनास देणे गरजेचे होते. त्यांच्या या कृतीमुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा संभव असल्याचे माहित असतांना देखील त्यांनी स्वत:ची व इतरांची सुरक्षीतता धोक्यात आनण्याचे कृत्य केले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. उस्मानाबाद (शहर) येथे गुन्हा दि. 14.04.2020 रोजी नोंदवण्यात आाला आहे.


आदेशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी वावर, निवारा गृह सोडले, 3 गुन्हे दाखल.
उस्मानाबाद जिल्हा:  उस्मानाबाद जिल्ह्यात दि.15.04.2020 रोजी होम कॉरंटाईन असुन सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)उमेश मारुती नलावडे रा. सरणवाडी, ता. परंडा, तर सार्वजनिक ठिकाणी नाका- तोंडास मास्क न लावता फिरणारे 2)कृष्णा भानुदास शेळवणे रा. शिवतेजनगर, ता.हवेली, जि.पुणे, तसेच उमरगा येथील निवारा गृहात प्रशासनाने ठेवलेले असतांनाही दि. 14.04.2020 रोजी प्रशासनाचा विरोध करुन हैद्राबादकडे निघुन गेलेल्या सुमारे 300 व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 15.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


लॉकडाउन असतांना विनाकारण रस्त्यावर फिरणारी 54 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्‍तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 14.04.2020 रोजी उस्मानाबाद (ग्रा.)- 5, तुळजापूर- 4, शहर वाहतुक शाखा- 45, अशी एकुण 54 वाहने ताब्यात घेतली आहेत.

No comments