Header Ads

ट्रॅक्टर- ट्रेलर मधुन प्रवासी वाहतूक, गुन्हा दाखलपोलीस ठाणे येरमाळा: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. असे असतांनाही नागपुर येथून पिंपळवाडी, ता.बार्शी येथे ट्रॅक्टर- ट्रेलर मधून आडवाटेने प्रवास करत जात असणारे 20 ऊसतोड कामगार येरमाळा पोलीसांनी दि. 13.04.2020 रोजी 20.30 वा. सु. येरमाळा येथील बांगरवाडी फाट्या जवळ ताब्यात घेउन त्यांची रवानगी जि.प. शाळा, येरमाळा येथे महसुल प्रशासनाने उभारलेल्या तात्पुरत्या निवारा गृहात केली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी आरोग्य विभागा मार्फत करुन घेण्यात आली आहे. ट्रॅक्टरचे चालक-मालक 1)गणेश पांडुरंग डुकरे रा. घारी, ता.बार्शी 2)नितीन सोमनाथ जाधव 3)रामहरी श्रीमंत जाधव दोघे रा. पिंपळवाडी, ता.बार्शी यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम-188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवथापनक कयादा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 13.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, शिराढोन: बाळु दगडु विरगट, अक्षय विरगट, रधा विरगट, मणकर्णा विरगट सर्व रा. कोथळा, ता.कळंब यांनी दि. 13.04.2020 रोजी 16.30 वा. सु. भाऊबंद- महेश शिवाजी विरगट यांना पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, उगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या महेश विरगट यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 13.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, आनंदनगर: मौजे शिंगोली, ता.उस्मानाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बोअरवेल मधील TMT कंपनीची 1.5 अश्वशक्तीचा विद्युत पंप (किं.अं. 16,000/-रु.) व एक लाकडी दरवाजा अज्ञात चोरट्याने दि. 22.01.2020 ते 12.04.2020 या कालावधीत चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या फुलाबाई कोळी (आरोग्य सेविका) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 14.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


जुगार अड्ड्यावर छापे.”
पोलीस ठाणे, आंबी: मगन उघडे, बापु उघडे, बिभीषण उघडे, मधुकर होगले, रामकिसन होगले सर्व रा. पाचवड, ता. परंडा हे सर्व दि. 13.04.2020 रोजी मौजे पाचवड शिवारात तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्यासह चार मोबाईल फोन व रोख रक्कम 1,100/- रु. (एकुण 3,500/-रु.) च्या मालासह पो.ठा. आंबी यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. आंबी येथे गुन्हा दि. 13.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: विजयकुमार सुतार, शंकर जाधव, राम भोगे, दत्तात्रय चुंगे, लहु कदम, बसवराज धरणे, धोंडीबा कागे, मोहन चव्हाण सर्व रा. जळकोट, ता. तुळजापूर हे सर्व दि. 13.04.2020 रोजी मौजे जळकोट येथील एका शेतात तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्यासह एक मो.सा., एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 1,73,160/-रु. च्या मालासह उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे गुन्हा दि. 13.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments