संचारबंदीत प्रवाशी वाहतूक केली, 2 गुन्हे दाखल


पोलीस ठाणे बेंबळी: सोमनाथ हरीभाउ भैराट रा. बामणी, ता.उस्मानाबाद हा त्याच्या ट्रक क्र. एम.एच. 12 एचडी 4804 मध्ये ठाणे व पुणे येथील 10 प्रवाशी घेउन आडवाटेने दि. 10.04.2020 रोजी 07.30 वा. सु. बामणी येथे आला. यावरुन सुरज कानडे, तलाठी- सज्जा बामणी यांच्या प्रथम खबरे वरुन वरील ट्रक चालकाविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, मो.वा.का. कलम-66/192 अन्वये गुन्हा दि. 10.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे तामलवाडी: एक अज्ञात टेम्पो ट्रॅव्हलर चालक 23 प्रवाशांना बसवून अवैध प्रवाशी वाहतुक करत असतांना पोलीस नियंत्रण कक्ष, उस्मानाबाद येथील पोनि. श्री. खाडे यांच्या पथकास  दि. 10.04.2020 रोजी 13.30 वा. पो.ठा. तामलवाडी हद्दीत सुरतगाव शिवारात आढळुन आला. यावरुन ट्रॅव्हलरच्या अज्ञात चालकाविरुध्द भा.द.वि. कलम- 188 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा कलम- 51 (ब) सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 10.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर,  10 गुन्हे दाखल.

उस्मानाबाद जिल्हा:  उस्मानाबाद जिल्ह्यात दि.10.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)आशिफ अन्सारी शेख रा. भुम 2)राहुल लष्करे 3)शुभम राउत दोघे रा. खर्डा, ता. जामखेड 4)राजेंद्र डोके 5)ऋषीकेश डोके 6)अभिजीत देशमुख 7)नारायण माळी चौघे रा. ईट, ता. भुम 8)गौतम बोलबट रा. वडाचीवाडी, तर उस्मानाबाद मार्केट यार्ड येथे आपल्या भाजी दुकानात ग्राहकांना सुरक्षीत अंतरावर उभे न करता गर्दी निर्माण करुन भाजी विक्री करणारे 9)नुर अहेमद शेख 10)समीर शेख 11)बाबुलाल शेख 12)जगन्नाथ रायभान 13)राजपाल दुधभाते सर्व रा. उस्मानाबाद, तसेच मौजे सालेगाव येथील चौकात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यास जमलेले 14)संतोष अंकुश घोगे 15)विशाल बडुरे 16)सोहेल मुल्ला 17)अमोल जाधव 18)स्वप्नील घोगे 19)मनोज माने 20)सुमीत यादव 21)निखील देशपांडे 22)ऋषीकेश साळुंखे सर्व रा. सालेगाव, ता. लोहारा या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये स्वतंत्र 8 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 10.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

तर दि.11.04.2020 रोजी मा. जिल्हाधिकारी यांनी किराणा दुकान चालू ठेवण्याची निश्चित केलेल्या वेळे व्यतीरीक्त दुकान चालू ठेवणारे 1)धनाजी नामदेव गोरे रा. कौडगाव, ता.उस्मानाबाद, तर सार्वजनिक ठिकाणी नाका- तोंडास मास्क न लावता फिरणारे 2)श्रावण युवराज पाटोळे रा.खामसवाडी, ता.कळंब या 2 व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 11.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments