Header Ads

क्वारंटाईन असुन सार्वजनिक ठिकाणी वावर, 2 गुन्हे दाखलउस्मानाबाद : गुलाब हसन शेख, समिर बशीर मुलानी, विजय बापुराव ठोसर सर्व रा. खासापुरी क्र.2, ता. परंडा यांना जिल्हा परिषद शाळा, खासापूरी क्र.2  येथे प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. असे असतांनाही ते दि. 27.04.2020 रोजी मौजे खासापूरी क्र.2 येथे नाका- तोंडास मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरले. तर, अल्ताफ गुलाब शेख रा. वाटवडा, ता. कळंब यांच्या हातावर क्वारंटाईन शिक्का असतांनाही ते दि. 28.04.2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आढळले अशा प्रकारे त्यांनी मा. जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. अशा मजकुराच्या शिक्षक व ग्रामसेवक यांच्या प्रथम खबरेवरुन वरील व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

गर्दी जमवून धान्य वाटप, गुन्हा दाखल.

 उस्मानाबाद - हर्षवर्धन राउत रा. उस्मानाबाद यांनी दि. 27.04.2020 रोजी 14.40 वा. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे लोकांची गर्दी निर्माण करुन अन्नधान्य वाटप केले. त्यांच्या या कृती मुळे कोरोना संसर्गजन्य आजाराच्या संक्रमनास वाव होउ शकतो हे माहित असतांना देखील त्यांनी निष्काळजीपणाचे कृत्य करुन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या पोहेकॉ- अविनाश पतंगे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 56 वाहने जप्त.”
उस्मानाबाद  लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 27.04.2020 रोजी उस्मानाबाद (शहर)- 1, तुळजापूर- 15, कळंब- 14, परंडा- 11, शहर वाहतुक शाखा- 15, अशी एकुण 56 वाहने ताब्यात घेतली आहेत.


लॉकडाउन- पानटपरी चालू ठेवली, गुन्हा दाखल.”
उस्मानाबाद (श.): प्रभाकर बनसोडे रा. अजिंठा नगर, उस्मानाबाद हा दि. 28.04.2020 रोजी 15.30 वा. सु. उस्मानाबाद येथे त्याच्या ताब्यातील पानटपरी उघडी ठेउन व्यवसाय करत असतांना उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा दि. 28.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments