Header Ads

“संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारी 31 वाहने जप्त.”


उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश झाला असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या अशा वाहनांच्या जपतीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार काल दि. 05.04.2020 रोजी बेंबळी पो.ठा.- 7 वाहने,  नळदुर्ग पो.ठा.- 1 वाहने, तुळजापूर पो.ठा.- 5 वाहने, शिराढोण पो.ठा.- 8 वाहने, वाशी पो.ठा.- 9 वाहने, भुम पो.ठा.- 1 वाहने अशी एकुण 31 वाहने ताब्यात घेतली आहेत.

संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, दुकाने- आस्थापना उघड्या ठेवल्या गुन्हे दाखल.
उस्मानाबाद जिल्हा: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, आस्थापना बंदचा- लॉकडाउनचा आदेश आहे.
               उस्मानाबाद जिल्ह्यात दि. 06.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)सचिन हाळनुर 2)महादेव हळनुर दोघे रा. वडगाव (नळी), ता.भुम, तर दुकान उघडे ठेवणारे आसीफ शेख रा.उस्मानाबाद
हन रोहीले 4)अशोक केरबा कुंभार 5)श्रावण बाळु रोहीले सर्व रा. लासोना, ता.उस्मानाबाद या सर्वांविरुध्द दि. 04.04.2020 रोजी भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, मु.पो.का. कलम- 135 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

मारहाण, 2 गुन्हे दाखल.”
पोलीस ठाणे, लोहारा: प्रकाश त्रिमुख आडसुळे रा. कानेगांव, ता. लोहारा हे दि. 05.04.2020 रोजी त्यांच्या राहत्या घरी असतांना भाउ- युवराज आडसुळे याने भांडणाची कुरापत काढून त्यांचे आईस मारहाण केली. सदर मारहाणीस प्रकाश आडसुळे यांनी विरोध केला असता त्यांना  युवराज, मिरा आडसुळे, नंदीनी आडसुळे, श्रीदेवी आडसुळे यांनी लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रकाश आडसुळे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द पो.ठा. लोहारा येथे गुन्हा दि. 05.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, वाशी: रामा दिगंबर शिंदे रा. बार्लोनी पिढी, वाशी यांस दि. 05.04.2020 रोजी 21.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घरी मुलगा  मच्छींद्र रामा शिंदे व सुन- शाहुबाई शिंदे यांनी घरातील भांडणावरुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन, चावा घेउन जखमी केले. अशा मजकुराच्या रामा शिंदे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 06.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments