Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात रस्ते अपघात, 2 मयत


पोलीस ठाणे, भुम: अशोक प्रभाकर तनपुरे रा. राळेसांगवी, ता. भुम याने दि. 31.03.2020 रोजी 21.30 वा. सु. बावी ते टेंबीआई रस्त्यावर ट्रॅक्टर क्र. एम.एच. 23 टी 5364 हा निष्काळजीपणे, हयगईने चालवून पायी चालत जात असलेले पिनेल अंगद कांबळे वय 35 वर्षे, रा. बावी, ता. भुम यांना धडक दिली. यात पिनेल कांबळे हे वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न ठेवता, अपघाताची खबर पोलीसांना न देता ट्रॅक्टर चालक घटना स्थळावरुन निघुन गेला. अशा मजकुराच्या दयानंद अंगद कांबळे (मयताचा भाऊ)यांच्या फिर्यादीवरुन वरील ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दि. 23.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रामीण): संजय काशीनाथ शिवलकर व मनिषा काशीनाथ मोहिते वय 40 वर्षे, दोघे रा. येडशी, ता. उस्मानाबाद हे दि. 19.02.2020 रोजी 10.30 वा. सु. मौजे येडशी येथील उड्डान पुलाजवळ मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 1727 ने प्रवास करत असतांना संजय शिवलकर याने मो.सा. निष्काळजीपणे, हयगईने चालवल्याने पाठीमागे बसलेल्या मनिषा मोहिते यांच्या साडीचा पदर मो.सा.च्या चाकात अडकुन त्या खाली पडून मयत झाल्या. अशा मजकुराच्या काशीनाथ मोहिते यांनी पो.ठा. आकस्मात मृत्यु क्र. 18/2020 मधील चौकशीत दिलेल्या जबाबावरुन वरील मो.सा. चालकाविरुध्द गुन्हा दि. 23.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, उमरगा: कलाप्पा मलकण्णा जमादार रा. खंडाळा, ता. आळंद, जि. गुलबर्गा हे करबसप्पा शेटी रा. खजुरी, ता. आळंद यांच्या सोबत मो.सा. क्र. केए 32 ईएन 4684 ने दि. 22.04.2020 रोजी 09.00 वा. सु. उमरगा ते आळंद प्रवास करत होते. दरम्यान खसगी येथे करबसप्पा यांनी मो.सा. निष्काळजीपणे चालवून ती अनियंत्रीत होउन रस्त्यातील खड्ड्यात आदळल्याने पाठीमागे बसलेले कलाप्पा जमादार हे खाली पडून त्यांचा पाय मोडला आहे. अशा मजकुराच्या कलाप्पा जमादार यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन वरील मो.सा. चालकाविरुध्द गुन्हा दि. 23.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments