Header Ads

“फेसबुकवरुन अफवा पसरवली, गुन्हा दाखल.”


पो.ठा. परंडा: अजित धन्यकुमार काकडे, रा. दहिटना, ता. परंडा याने दि. 07.04.2020 रोजी त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन नोटा जमिनीवर विखुरलेल्या असलेला एक छायाचित्र प्रसिध्द केले. या सोबत ‘रस्त्यावर किंवा आपल्या आजुबाजूला पडलेल्या अशा नोटांना हात लाउ नका, कदाचीत या नोटा जाणीवपुर्वक थुंकी लाउन कोरोना विषानुचा फैलाव करण्यासाठी रस्त्यावर टाकल्या जाउ शकतात.’ असे निवेदन (पोस्ट) प्रसिध्द केले.
            यावरुन समाजात भय निर्माण होईल अशी अफवा पसरवल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, 505 (2) अन्वये गुन्हा दि. 07.04.2020 रोजी नोंदवण्यात आला असुन सायबर पो.ठा. मार्फत तपास केला जात आहे.

उस्मानाबाद लाइव्ह अँप डाऊन लोड करा 

No comments