दुकान उघडे ठेवण्यास विरोध करणाऱ्या पोलीस पाटलास मारहाण


पोलीस ठाणे, परंडा: गौतम अभिमान लोखंडे, मुकेश गौतम लोखंडे, दत्ता काशीद सर्व रा. पाचपिंपळा, ता.परंडा यांनी पाचपिंपळा गावातील केश कर्तनालय संचारबंदी काळात दुकान बंदीचा आदेश असतांनाही दि. 01.04.2020 रोजी 08.30 वा. सु. उघडे ठेवले होते. यावर गावचे पोलीस पाटील श्री अनंत बबन धुमाळ यांनी त्यांना तसे दुकान उघडे ठेवण्यास विरोध केला. यावरुन वरील सर्वांनी मिळुन पोलीस पाटील यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अनंत धुमाळ यांच्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 01.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
मारहाण.”
पोलीस ठाणे, मुरुम: शेतातील रस्त्याने मळणी यंत्र नेन्याच्या वादावरुन मीना व्यंकट कांबळे रा. कोराळ, ता.उमरगा यांना व त्यांचे पती, दोन मुले यांना दि. 31.03.2020 रोजी 10.30 वा. सु. मौजे कोराळ येथे गावातीलच गोविंद रामा कोळी, ज्ञानोबा कोळी, शेषेराव कोळी, प्रल्हाद कोळी यांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मीना कांबळे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 01.04.2020 रोजी नोंवण्यात आला आहे.
 “चोरी.”
पोलीस ठाणे, लोहारा: तिरुपती रामलु वल्याळ रा. सास्तुर, ता.लोहारा यांच्या सास्तुर चौरस्ता येथील ‘हॉटेल ममता & बिअर बार’ च्या खिडकीचे गज अज्ञात चोरट्याने काढून दि. 29.03.2020 वा. 22.30 ते 30.03.2020 रोजी 22.30 वा. चे दरम्यान आत मधील विदेशी दारुच्या बाटल्या किं.अं. 67,800/-रु. व सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर किं.अं. 4,000/- रु. असा एकुण 71,800/- रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या तिरुपती वल्याळ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 31.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments