Header Ads

सोनारीचा काळभैरवनाथ यात्रा उत्सव प्रथमच रद्द
परंडा ( राहुल शिंदे ) -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व  यात्रा उत्सव रद्द करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते, त्याचा फटका .सोनारीच्या काळभैरवनाथ यात्रेलाही बसला आहे. गेल्या पाचशे वर्षांपासून सुरु असलेली  काळभैरवनाथ रथोत्सव यात्राची परंपरा यंदा प्रथमच खंडीत झाली आहे.

 परंडा तालुक्यातील सोनारी येथे काळभैरवनाथचे प्रसिद्ध देवस्थान आहे.  भैरवनाथाचे मंदिर फार पुरातन व जागृत असून हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम आहे.महाराष्ट्रासह,कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातून लाखो भाविक यात्रेदिवशी येथे दर्शनासाठी  येत असतात. दरवर्षी श्री क्षेत्र सोनारी येथे चैत्र वद्य अष्टमी पासून ते त्रयोदशीपर्यंत मोठी यात्रा भरते. यंदा दि:१८,१९ व २० एप्रिल रोजी होणारा श्री काळभैरवनाथांचा यावर्षीचा याञा उत्सव रद्द करण्यात आला आहे.

मंदिरात फक्त धार्मिक विधी पूजा होणार आहे.दर्शनासाठी कोणालाही परवानगी नाही, त्यामुळे अनावश्यक गर्दी करू नये , आपल्या घरीच सुरक्षित राहावे,.असे  आवाहन  मुख्य पुजारी संजय महाराज यांनी केले आहे.


No comments