Header Ads

“क्वारंटाईन असुनही सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हा दाखल.”


पोलीस ठाणे, आंबी:  राजेंद्र हनुमंत शेवाळे रा. शेळगांव, ता. परंडा यास पुणे येथे कॉरंटाईन केले असतांनाही तो शेळगांव येथे परतून दि. 22.04.2020 व 23.04.2020 रोजी घरा बाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करतांना आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 23.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

संचारबंदीत प्रवाशी वाहतूक केली, गुन्हा दाखल.”
पोलीस ठाणे मुरुम: अक्षय युवराज राऊत रा. काक्रंबा, ता. उस्मानाबाद याने दि. 22.04.2020 ते 23.04.2020 या कालावधीत वाहन क्र. एम.एच. 12 एलटी 4106 मध्ये हवेली, जि. पुणे येथील 5 प्रवाशांना पोलीस नाकाबंदी टाळून आडवाटेने मौजे दाळींब, ता. उमरगा येथे घेउन आला. यावरुन पोलीस पाटील- अश्विनी वाले यांच्या फिर्यादीवरुन वरील टॅम्पो चालकाविरुध्द भा.दं.वि. कलम-188, 269, 270 अन्वये गुन्हा दि. 23.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मारहाण.”
पोलीस ठाणे, ढोकी: दि. 17.04.2020 रोजी 21.00 वा. चे दरम्यान तेर, ता. उस्मानाबाद येथे शबाना अन्सार मुलानी व अन्य 2 सहकारी यांचा घरगुती भांडणाच्या कारणावरुन नातेवाई- सारा उमराव मुलानी व अन्य 1 व्यक्ती यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, बतईने (चाकु) वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. ढोकी येथे दि. 23.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे, तुळजापूर: कविता सोनवणे रा. कात्री ता. तुळजापूर या दि. 22.04.2020 रोजी कुटूंबा समवेत स्वत:च्या शेतात असतांना गावातीलच- रीतेश व त्याचे वडील अशोक देशमुख, सुदर्शन व त्याचे वडील राजाभाउ देशमुख या चौघांनी कविता सोनवणे यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांना शेतजमीनीच्या वादावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या कविता सोनवणे यांनी दि. 23.04.2020 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: अशोक बब्रुवान देशमुख रा. कात्री, ता. तुळजापूर हे दि. 22.04.2020 रोजी 10.00 वा. सु. मौजे कात्री येथील त्यांच्या शेतातून सामाईक बांधाने घरी जात होते. यावेळी रहदारीच्या कारणावरुन गावातीलच-शत्रुघ्न लक्ष्मण सोनवणे, अनिल सोनवणे, करण सोनवणे, कविता सोनवणे यांनी अशोक देशमुख यांना शिवीगाळ करुन, काठीने मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील 50,000/- रु. काढून घेतले व कोनास काही सांगीतले तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अशोक देशमुख यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 23.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
                                                                                     

No comments