Header Ads

“अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्दाचा मृत्यु.”


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (शहर): बलभीम लक्ष्मण मगर वय 75 वर्षे, रा. खानापुर, ता.उस्मानाबाद हे दि. 06.04.2020 रोजी 21.30 वा. सु. मौजे खानापुर येथील बार्शी -उस्मानाबाद रस्त्याने पायी चालत (शतपावली) जात होते. यावेळी एका अज्ञात वाहन चालकाने वाहन निष्काळजीपणे, हयगईने चालवून बलभीम मगर यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. जखमीस वैद्यकीय उपचारास न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरुन निघुन गेला. अशा मजकुराच्या गुणवंत बलभीम मगर (मयताचा मुलगा) यांच्या फिर्यादीवरुन संबंधीत वाहन चालकाविरुध्द गुन्हा दि. 07.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.मारहाण, 2 गुन्हे दाखल.”
पोलीस ठाणे, आंबी: नमन तुळशीराम काळे व त्यांच्या मुली- अंजली व मंगल रा. हंगेवाडी, ता. परंडा यांना दि. 06.04.2020 रोजी 16.00 वा. सु. मौजे हंगेवाडी येथे आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन उलन संदीपान पवार, संदीपान पवार, शिवाजी उलन पवार, सावित्रा उलन पवार सर्व रा. पाथरुड, ता.भुम यांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नमन काळे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 06.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, आंबी: शरद शंकर चव्हाण, अरुण चव्हाण, बापु शंभु गिरी सर्व रा. जगदाळवाडी, ता. परंडा यांनी दि. 06.04.2020 रोजी 21.00 वा. सु. मौजे जगदाळवाडी येथे गावातीलच ज्ञानेश्वर लहु गिरी यांना तु आमच्या विरुध्द न्यायालयात साक्ष का दिली, तुला आता जिवंत ठेवणार नाही. असे धमकावून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, सळईने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर गिरी यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 07.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, कळंब: सुजीत रामदास लड्डा रा. कळंब यांनी कोरोना विषानुमुळे लॉकडाउन असल्याने दि.21.03.2020 पासुन शिवाजी चौक, कळंब येथील त्यांचे ‘गजानन ट्रेडींग दुकान’ बंद ठेवले आहे. दि. 03.04.2020 ते 06.04.2020 या कालावधी दरम्यान त्यांच्या दुकानाच्या शटरच्या पट्ट्या अज्ञात चोरट्याने उचकटून दुकानातील रोख रक्कम 9,000/-रु. व 36,845/- रु. चे साहित्य असा एकुण 45,854/- रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सुजीत लड्डा यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 06.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, कळंब: दत्तात्रय सुरेश लोखंडे रा. मुंडे गल्ली, कळंब यांच्या होळकर चौक, कळंब येथील किराणा दुकानाचे कुलूप दि. 03.04.2020 रोजी 14.00 ते 07.04.2020 रोजी 09.00 वा. चे दरम्यान अज्ञात चोरट्याने तोडून दुकानातील जिवनावश्यक साहित्य (तेल डब्बे, साबन, कोलगेट, चहापत्ती, तांदुळ कट्टे, पॅराशुट तेल बॉटल एकुण किं.अं.1,13,100/-रु.) व रोख रक्कम 7,000/-रु. असा एकुण 1,20,100/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या दत्तात्रय लोखंडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 07.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.
1) आरती खंडु कांबळे रा.सेवालाल कॉलनी, उस्मानाबाद या दि. 06.04.2020 रोजी त्यांच्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 ली. गावठी दारु (किं.अं. 520/-रु.) बाळगलेल्या असतांना पो.ठा. आनंदनगर यांच्या पथकास आढळल्या.
2) भागवत मुरलीधर बल्लाळ रा. घाटंग्री, ता.उस्मानाबाद हा दि. 06.04.2020 रोजी त्यांच्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 30 ली. गावठी दारु (किं.अं. 1,500/-रु.) बाळगलेला असतांना पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) यांच्या पथकास आढळला.
3) नंदु गेना गायकवाड रा. केरुन, ता.तुळजापूर हा दि. 06.04.2020 रोजी मौजे करुर येथे एका शेड मध्ये दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 60 ली. गावठी दारु (किं.अं. 3,600/-रु.) बाळगलेला असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळला.
4) भिमा राजाराम काळे रा.जांब, ता.भुम हा दि. 06.04.2020 रोजी त्यांच्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 5 ली. गावठी दारु (किं.अं. 350/-रु.) बाळगलेला असतांना पो.ठा. भुम यांच्या पथकास आढळला.
5) किसन माणिक पांढरे रा. मुरुम मोड, ता.उमरगा हा दि. 06.04.2020 रोजी मौजे येणेगूर शिवारात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 8 बाटल्या (किं.अं. 1,320/-रु.) बाळगलेला असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळला.
6) मिना राम काळे रा. इंदीरानगर, उस्मानाबाद, नितीन दिनकर जानराव रा. भिमनगर, उस्मानाबाद हे दोघे दि. 06.04.2020 रोजी इंदीरानगर येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एकत्रीत 65 ली. गावठी दारु व ताडी (साहित्यासह किं.अं. 4,600/-रु.) बाळगलेल्या असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळल्या.
यावरुन वरील व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा येथे स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments