Header Ads

परंडा तालुक्यात गारपीट : पंचनामे करण्याच्या कामाला वेगपरंडा ( राहुल शिंदे - एकीकडे  कोरोनाचे संकट घोंगावत असताना दुसरीकडे उस्मानाबाद  जिल्ह्यात   विशेषतः परंडा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गारपीटीमुळे मोसंबी,आंबा, खरबुज, कलिंगड,  डाळिंब,द्राक्ष बागांचे नुकसान झालंय, .तर गहू, हरभरा, मका अशा रब्बी पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना अवेळी येणाऱ्या पावसाचा सामना करावा लागत आहे. मागील हंगामात  मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले होते. पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. यात बऱ्याच ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाल्याने फळबागांना फटका बसला आहे.

परंडा तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे चिंचपूर(बु) येथील गरीब शेतकरी आजिनाथ दाजी केमदारे यांची म्हैस वीज पडून मरण पावली होती,त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच  या भागात गहू, हरभरा, मका, फळबाग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

तालुक्याचे तहसीलदार .तुषार बोरकर यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तलाठय़ांना दिले.त्या आदेशाचे पालन करत आज तालुक्यातील वाटेफळ येथे कृषीस हाय्यक मेहेर  व तलाठी श्रीमती मोनिका मसुडगे यांनी पंचनामे केले.

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या  -आ.सुजितसिंह ठाकूर

         उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जनासह अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना लवकरात तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी  केली आहे.
   

उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जनासह अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात...

Posted by Osmanabad Live on Thursday, April 16, 2020

No comments