Header Ads

“कोंबड्या चोरतांना चोर ताब्यात.”


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): सौरभ तानाजी निंबाळकर रा. रघुराज नगर, वैराग रोड, उस्मानाबाद यांच्या घरा मागील कोंबड्यांच्या खुराड्यातून दि. 05.04.2020 रोजी 02.30 वा. सु. संजय अंकुश पवार रा. दुध डेअरी, पारधी पिढी, उस्मानाबाद व अन्य दोन अनोळखी व्यक्ती यांनी 15 कोंबड्या (किं.अं. 4,500/-रु.)चोरुन त्यांची मान पिरगाळून मोडून एका गोनीत भरुन घेउन जात होते. यावेळी सौरभ निंबाळकर यांना चाहुल लागताच त्यांनी भावाला सोबत घेउन चोरांचा पाठलाग करुन संजय पवार यास पकडले तर अन्य दोन अंधारात फरार झाले. अशा मजकुराच्या सौरभ निंबाळकर यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 05.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


मारहाण, 3 गुन्हे दाखल.”
पोलीस ठाणे, परंडा: रोहीनीबाई लहु नरुटे रा. ईडा, ता.भुम या दि. 02.04.2020 रोजी 15.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घरा समोर थांबल्या असता शेजारील नागेश विश्वनाथ नरुटे यांनी पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून रोहीनीबाई नरुटे यांना शिवीगाळ करुन, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रोहीनीबाई नरुटे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, वाशी: शिवाजी भोगे रा. मांडवा, ता.वाशी हे दि. 02.04.2020 रोजी 15.00 वा. सु. त्यांच्या गावातील शेतात असतांना भाउबंद- प्रकाश भोगे, विकास भोगे, विशाल भोगे, स्वाती भोगे यांनी शेतजमिनीच्या भांडणाच्या कारणावरुन शिवाजी भोगे यांना शिवीगाळ करुन मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तर विकास याने शिवाजी यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या शिवाजी भोगे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 05.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, ढोकी: शरद रामभाउ देशमुख रा. जागजी, ता.उस्मानाबाद हे दि. 03.04.2020 रोजी सायंकाळी 09.00 वा. सु. सव्त: च्या राहतया घरा समोर भावजय- मिरा यांच्या सोबत थांबले असतांना भाउबंद- तानाजी देशमुख, शारदा देशमुख, सुशिला गरड यांनी शेतातील रस्त्याच्या वादावरून शरद देशमुख व मिरा देशमुख यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात दगडाचा मार बसल्याने शरद यांचा डावा हात मोडला आहे. अशा मजकुराच्या शरद देशमुख यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 05.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


जुगार अड्ड्यावर छापे.”
पोलीस ठाणे, परंडा: हनुमंत काकडे, भगवान जाधवर, बापुराव निकम, बालाजी मुळे, शहाजी मुळे, शिवाजी काकडे सर्व रा. तांबेवाडी, ता.भुम हे दि. 04.04.2020 रोजी मौजे तांबेवाडी शिवारात तांबेवाडी ते देवळाली रस्त्याच्या बाजुस तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम एकत्रीत 2,400/- रु. च्या मालासह पो.ठा. परंडा यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. परंडा येथे गुन्हा दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, तामलवाडी: संजय बोबडे, हनुमंत फंड, हनुमंत जगदाळे, राहुल काशिद, पंडीत फंड, इंद्रजित फंड, राजेंद्र फंड सर्व रा. जळकोटवाडी, ता.तुळजापूर हे दि. 04.04.2020 रोजी मौजे जळकोटवाडी येथील समाज मंदीर येथे तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम एकत्रीत 1,790/- रु. च्या मालासह पो.ठा. तामलवाडी यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. तामलवाडी येथे गुन्हा दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: गफुर तालीकोटे, अनिल लांडगे, श्रीकांत जोकार, इस्माईल शेख, मुबारक शेख, ज्ञानेश्वर आसापूरे, बालाजी ईडागोटे, गुंडाप्पा तेलंग, सैफन बांगेवाले, अक्षय तेलंग, गौरु पाटील सर्व रा. काटगांव, ता. तुळजापूर हे दि. 05.04.2020 रोजी काटगाव- देवकूरुळी रोडवर, पाझर तलावा जवळ तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य, वाहन व रोख रक्कम एकत्रीत 1,54,550/- रु. च्या मालासह उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे गुन्हा दि. 05.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, परंडा: हनुमंत काकडे, भगवान जाधवर, बापुराव निकम, बालाजी मुळे, शहाजी मुळे, शिवाजी काकडे सर्व रा. तांबेवाडी, ता.भुम हे दि. 04.04.2020 रोजी मौजे तांबेवाडी शिवारात तांबेवाडी ते देवळाली रस्त्याच्या बाजुस तिरट जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम एकत्रीत 2,400/- रु. च्या मालासह पो.ठा. परंडा यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. परंडा येथे गुन्हा दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.


अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.
1) बाबासाहेब सदाशिव हंगे रा. सोनारी, ता.परंडा हा दि. 04.04.2020 रोजी सोनारी येथील स्वत: च्या शेतात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 144 बाटल्या (किं.अं. 24,960/-रु.) बाळगला असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम यांच्या पथकास आढळुन आला. यावरुन वरील आरोपीविरुध्द पो.ठा आंबी येथे गुन्हा दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
2) शामल गंगाराम जाधव रा. काळेगाव, ता.तुळजापूर या दि. 04.04.2020 रोजी मोजै काळेगाव येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 ली. गावठी दारु (किं.अं. 800/-रु.) बाळगल्या असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळुन आल्या. यावरुन वरील आरोपीविरुध्द पो.ठा नळदुर्ग येथे गुन्हा दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
3) शिवाजी सोपान काळे रा. झगडे गल्ली, भुम हे दि. 04.04.2020 रोजी गोलाई चौक, भुम येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 ली. गावठी दारु (किं.अं. 800/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. भुम यांच्या पथकास आढळुन आला. यावरुन वरील आरोपीविरुध्द पो.ठा भुम येथे गुन्हा दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
4) निवृत्ती सोमा काळे रा. पापनाश नगर, पारधी पिढी, उस्मानाबाद हा दि. 05.04.2020 रोजी मौजे रुईभर येथील स्वत: च्या शेतात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 16 ली. गावठी दारु (किं.अं. 960/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. बेंबळी यांच्या पथकास आढळुन आला. यावरुन वरील आरोपीविरुध्द पो.ठा बेंबळी येथे गुन्हा दि. 05.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
5) शिवाजी लाला काळे रा. वाठवडा, ता.कळंब हा दि. 05.04.2020 रोजी मौजे वाठवडा शिवारात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 ली. गावठी दारु (किं.अं. 650/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. शिराढोण यांच्या पथकास आढळुन आला. यावरुन वरील आरोपीविरुध्द पो.ठा शिराढोण येथे गुन्हा दि. 05.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
6) राजेंद्र राठोड व आकाश आडे दोघे रा.नळदुर्ग, ता.तुळजापूर हे दोघे दि. 05.04.2020 रोजी आष्टाकासार ते आष्टा जाणाऱ्या रोडने दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने दोन मो.सा. वर  20 ली. गावठी दारु (वाहना सह किं.अं. 61,200/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन वरील आरोपींविरुध्द पो.ठा मुरुम येथे गुन्हा दि. 05.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
मोटार वाहन कायदा-नियमांचे उल्लंघन 169 कारवाया.
उस्मानाबाद जिल्हा: दि. 04/04/2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा-उस्मानाबाद यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या विविध कलम-नियमांनुसार 169 कारवाया केल्या असुन त्यातुन 36,000 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल करण्यात आले आहे.

No comments