संचारबंदीत प्रवाशी वाहतूक केली, गुन्हा दाखल


स्थानिक गुन्हे शाखा: महेश रामचंद्र शिंदे रा. उस्मानाबाद यांची उस्मानाबाद MIDC परिसरात उद्योग व्यवसाय आहे. कारखान्यात काम करण्याकरीता 1)गणी व्होरा 2)सिराज शेख 3)महंमद शेख 4)अलिमोद्दीन व्होरा सर्व रा.हैद्राबाद यांना महेश शिंदे यांनी उमरगा ते उस्मानाबाद असे स्वत:च्या कार मध्ये संचारबंदी चालू असतांना दि. 13.04.2020 रोजी आडवाटेने वाहुन आणले. तसेच कारखान्यात राहण्यास जागा दिली. याची माहिती त्यांनी प्रशासनास दिली नाही.  यावरुन पोउपनि श्री. खोडेवाड यांच्या प्रथम खबरे वरुन वरील पाचहि व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270, 271, 34 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 13.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

विनाकारण रस्त्यावर फिरणारी 88 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश झाला असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्‍तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 12.04.2020 रोजी उस्मानाबाद (श.)- 16, तुळजापूर- 20, नळदुर्ग- 1, वाशी- 3, कळंब- 8, शहर वाहतुक शाखा- 40, अशी एकुण 88 वाहने ताब्यात घेतली आहेत.

आदेशाचे उल्लंघन करुन दुकाने- आस्थापना उघड्या ठेवल्या, 4 गुन्हे दाखल.
उस्मानाबाद जिल्हा:  उस्मानाबाद जिल्ह्यात दि.12.04.2020 रोजी मा.जिल्हाधिकारी यांनी किराणा दुकाने चालू ठेवण्याची निश्चित केलेली वेळ 07.00 ते 11.00 वा. पर्यंत असतांनाही या वेळे व्यतीरीक्त दुकाने चालू ठेवणारे 1)उमेश वामन शिंदे रा. घाटंग्री, ता.उस्मानाबाद 2)आप्पाराव शिवाजी माळी 3)विजय महादेव माळकर दोघे रा.आळणी, ता.उस्मानाबाद, तर अजिंठानगर, उस्मानाबाद येथे ‘सलोनी पानटपरी’ मध्ये गुटखा- तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणारे 4)प्रभाकर सुधाकर बनसोडे रा. उस्मानाबाद, या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 अन्वये स्वतंत्र 4 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 12.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

पोलीसांनी केली पायी जाणाऱ्या 25 स्थलांतरीतांची रवानगी निवारा गृहात.”
उस्मानाबाद जिल्हा: आज दि. 13.04.2020 रोजी पोलीस ठाणे, भुम यांच्या पथकास पंढरपूर ते मध्यप्रदेश असे पायी जाणाऱ्या 8 व्यक्ती भुम येथे आढळल्या. तर पोलीस ठाणे, परंडा यांच्या पथकास 17 कामगार कुर्डुवाडी ते गोंदीया असे पायी जात असतांना परंडा येथे आढळल्या. या सर्वांची रवानगी महसुल प्रशासनाने उभारलेल्या तात्पुरत्या निवारा गृहात (शेल्टर होम) मध्ये करण्यात आली असुन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

No comments