दिल्लीहुन परतलेला येणेगुरचा व्यक्ती उपजिल्हा रुग्णालयात दाखल

दोन पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३९ जणांचे स्वॅब तपासणीलाउस्मानाबाद  - उमरगा तालुक्यातील बलसूर येथे एक तर लोहारा तालुक्यातील धानुरी येथे एक असे दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शनिवार आणि उद्या रविवार रोजी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.दरम्यान  बलसूर आणि धानुरी रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३९ जणांना उमरगा उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी दाखल करण्यात आले असून त्यातील ३० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्लीहुन परतलेल्या येणेगुर येथील एकालाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


उमरगा शहरासह तालुक्यात बाहेरून आलेल्या तीस जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासाजनक बाब होती. मात्र एक एप्रिलला पानिपत-दिल्लीमार्गे बलसूर येथे परतलेल्या एका दाम्पत्याचा अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाल्यानंतर दोघांपैकी तरूणाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

प्रशासनाने संबंधित तरुणाच्या कुटुंबीयासह नातेवाईक असे चौदा, तर संपर्कात आलेल्या पंधरा जणांना स्वॅब तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उमरगा शहरातील एक विवाहित तरुण व त्याची आई दिल्ली शहराजवळील एका गावात धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. ते दोघेही शहरात येऊन आठवडा झाला, मात्र ते कुटुंबापासून दूर रहात असल्याची माहिती मिळाली; तरीही प्रशासनाने खबरदारी म्हणून त्या दोघांना गुरुवारी मध्यरात्री रुग्णालयात आणले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे.

दरम्यान, लोहारा तालुक्यातील धानुरीचा तरुण पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत. त्याच्या धानुरी येथील चार नातेवाईकाचे, तर आष्टाकासार येथील चार नातेवाईकांना तपासणीसाठी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.

बलसूर व धानुरी येथील पॉझिटिव्ह आलेल्या दोघांवर रूग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या दोघांच्या संपर्कात आलेल्या ३९ जणासह येणेगुर येथील दिल्लीहून आलेला एक असे एकूण चाळीस जणापैंकी ३० जणांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उर्वरीत दहा जणांचा स्वब शनिवारी पाठविण्यात येणार आहेत.
- डॉ. पंडीत पुरी, वैद्यकिय अधिक्षक 

2 comments

swapnil blog said...

अशीच माहिती कळवा उस्मानाबाद live

Apparao said...

माझा उस्मानाबाद....प्लिज अपडेटस देत रहा.