धक्कादायक : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

 

धक्कादायक : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

उस्मानाबाद - उस्मानाबाद  जिल्ह्यात  कोरोना  पॉजिटीव्ह पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


हा रुग्ण  उमरगा तालुक्यातील बलसूर येथील रहिवासी असून त्याच्यावर उमरगा उप जिल्हा  रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सदरील तरुण  हा दिल्ली  गेला होता व तो 2 दिवसांपूर्वी उमरगा येथे आला होता, त्यांनतर त्याचे स्वॅब नमुने घेतले होते, त्याचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आलं आहे. त्याच्यावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

कोरोना बाधित तरुणाचे वय ३१ आहे.  तो दिल्लीवरून बलसूरमध्ये  आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

या कोरोना बाधित  तरुणाच्या  संपर्कात कितीजण आले याचा  शोध प्रशासनाने सुरु केला आहे.


कोरोना बाधित तरुण पान मसाला विक्रीचा व्यवसाय  करतो आणि त्याचा आजुबाजुच्या गावात मोठ्या प्रमाणात संपर्कात आल्याचे कळते , त्यामुळे बलसूर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


सविस्तर माहिती लवकरच ... 







From around the web