वाहनावर बनावट पास लाउन प्रवास, गुन्हा दाखलनळदुर्ग: तमीम साहेब काझी, सोहेल कदिर कुरेशी, कुनाल पासमेल, मेहमुद शेख, सर्व रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर यांनी संगणकाच्या सहाय्याने अत्यावश्यक सेवा असा बनावट पास बनवून तो खरा असल्याचे भासवून त्यांची स्कॉर्पिओ क्र. एम.एच. 13 सीके 1739 च्या समोरील काचेवर लाउन प्रवास करत असतांना दि. 11.04.2020 रोजी 18.30 वा. सु. नळदुर्ग बसस्थानक समोर पो.ठा. नळदुर्ग चे सपोनि श्री. वानखेडे यांच्या पथकास आढळुन आले. अशा प्रकारे वरील आरोपींनी प्रशासनाची फसवणूक केली. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 420, 467, 468, 471, 188, 268, 269, 271, 34 सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये गुन्हा दि. 12.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे

दोन दिवसांत 303 वाहने जप्त.”
उस्मानाबाद ;  लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश झाला असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जपतीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 10.04.2020 व 11.04.2020 या दोन दिवशी उस्मानाबाद (श.)- 11, उस्मानाबाद (ग्रा.)- 10, आनंदनगर- 4, बेंबळी- 2 तुळजापूर- 64, तामलवाडी- 7, ढोकी- 5, कळंब- 109, शहर वाहतुक शाखा- 72, शिराढोण- 19 अशी एकुण 303 वाहने ताब्यात घेतली आहेत.

No comments