Header Ads

लॉकडाउन : चार गुन्ह्यांत प्रत्येकी एक हजार दंडाची शिक्षा


नळदुर्ग: लॉकडाउन काळात सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या, नाका-तोंडास मास्क न लावणाऱ्या, प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुध्द पो.ठा. नळदुर्ग गु.र.क्र. 94,95,96,97/2020 या चार गुन्ह्यांतील चार आरोपींना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी भा.दं.वि. कलम- 188, 269 च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून प्रत्येकी 1,000/-रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.

लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 29 वाहने जप्त.”
 लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 28.04.2020 रोजी कळंब- 9, परंडा- 8, शहर वाहतुक शाखा- 12, अशी एकुण 29 वाहने ताब्यात घेतली आहेत.

No comments