Header Ads

मोबाईल फोन कॉलद्वारे आर्थिक फसवणूकउस्मानाबाद : बाळासाहेब भास्कर कसबे रा. उपळा, ता. उस्मानाबाद यांना दि. 15.04.2020 रोजी 11.45 वा. सु. एका इसमाने एका अनोळखी मोबाईल फोन क्रमांकावरुन फोन करुन  बजाज फायनान्स चे मोटार सायकल कर्जाचे प्रलंबीत हप्ते भरायचे आहेत. तुम्ही क्युएस ॲप डाउनलोड करुन अलाउ या बटनावर क्लीक करा. असे सांगीतले. दरम्यान त्यांना मोबाईल फोन वर बोलते ठेउन, पत्नीच्या बँक खात्याची माहिती घेउन पत्नीच्या बँक खात्यातील 58,311/- रु. ऑनलाईन पध्दतीने हस्तांतरीत करुन फसवणूक केली. अशा मजकुराच्या बाळासाहेब कसबे यांच्या फिर्यादीवरुन संबंधीत अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 16.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

आदेशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हा दाखल.


 उस्मानाबाद जिल्ह्यात दि.16.04.2020 रोजी मौजे भाटशिरपुरा येथे सार्वजणीक ठिकाणी आपापसात भांडणे करुन सार्वजनिक शांतता भंग करुन नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)बळीराम बाबुराव खापे 2)मनोज ज्ञानदेव खापे 3)अशोक बाबुराव खापे 4)युवराज बाबुराव खापे 5)गणेश प्रभाकर खापे सर्व रा. भाटशिरपुरा, ता. कळंब या व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 160, 188, 269 अन्वये गुन्हा पो.ठा. शिराढोण येथे दि. 16.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे


लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 74 वाहने जप्त.”


 लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्‍तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 16.04.2020 रोजी उस्मानाबाद (शहर)- 17, तामलवाडी- 3, कळंब- 4, नळदुर्ग- 1, ढोकी- 2, शिराढोण- 2, तुळजापूर- 25, शहर वाहतुक शाखा- 20, अशी एकुण 74 वाहने ताब्यात घेतली आहेत.

No comments