Header Ads

वाईन शॉपमधील चोरी, चोर मुद्देमालासह अटकेत


स्थानिक गुन्हे शाखा: तिरुपती रामलु वल्याळ रा. सास्तुर, ता.लोहारा यांच्या सास्तुर चौरस्ता येथील ‘हॉटेल ममता & बिअर बार’ च्या खिडकीचे गज अज्ञात चोरट्याने दि. 29.03.2020 रोजी रात्री काढून आतील विदेशी दारुच्या बाटल्या किं.अं. 67,800/-रु. व सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर किं.अं. 4,000/- रु. असा एकुण 71,800/- रु. चा माल चोरुन नेला होता.
            या गुन्हा तपासात स्था.गु.शा. चे पो.नि. श्री दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. खोडेवाड, माने, पोहेकॉ- जगताप, थोरात, शेळके, सय्यद, चव्हाण यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 05.04.2020 रोजी 1)विक्रम लालू जाधव 2)सुनिल राठोड 3)रणजित जाधव तीघे रा. बोरामणी तांडा, ता.निलंगा 4)विशाल राठोड रा. माडज, ता. उमरगा 5)महिताब मनियार रा. सारवडी, ता.निलंगा यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली दारु व चोरी करीता वापरलेली स्विफ्ट कार जप्त केली आहे.

अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.
1) शिवराज निर्मलकुमार गायकवाड व प्रिया गायकवाड दोघे रा. भिमनगर, मुरुम, ता.उमरगा हे दि. 05.04.2020 रोजी भिमनगर, मुरुम येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 5 बाटल्या व 10 पाउच (किं.अं. 1,800/-रु.) बाळगले असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळले.
2) महादेवी लक्ष्मण पवार रा.वाशी या दि. 06.04.2020 रोजी त्यांच्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 20 ली. गावठी दारु (किं.अं. 1,450/-रु.) बाळगलेल्या असतांना पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळल्या.
3) भागवत बल्लाळ रा. घाटंग्री, ता.उस्मानाबाद हा दि. 06.04.2020 रोजी त्यांच्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 35 ली. गावठी दारु (किं.अं. 1,500/-रु.) बाळगलेला असतांना पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) यांच्या पथकास आढळला.
4) विठ्ठल कदम उर्फ सुधीर रा. येडशी, ता.उस्मानाबाद हा दि. 05.04.2020 रोजी येडशी- बार्शी रस्त्यावरील पुला जवळ दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने देशी दारुच्या 24 बाटल्या (किं.अं. 1,248/-रु.) बाळगलेला असतांना पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) यांच्या पथकास आढळला.
यावरुन वरील व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा येथे स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments