Header Ads

“ढोकेश्वर मल्टीस्टेट बँकेत ठेवीदारांची आर्थिक फसवणूक.”


पोलीस ठाणे, लोहारा: रामेश्वर स्वामी- शाखा व्यवस्थापक, सतिश काळे- चेअरमन, भाऊसाहेब शिंदे- व्हा. चेअरमन, दत्तात्रय बोरसे- सचिव व सोसायटीचे 10 सदस्य सर्व रा. लासलगांव, ता.निफाड, जि.नाशिक यांनी जास्त व्याजदर देण्याचे आमिष विठ्ठल काशिनाथ कोकरे रा. मार्डी, ता.लोहारा यांना दाखवून ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को. सोसायटी, शाखा- लोहारा येथे 2017 साली  1 लाख रु. ठेवण्यास भाग पाडले. सदर ठेवीची मुदत 16.06.2018 रोजी संपली परंतु ती रक्कम परत दिली नाही. उलट ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को. सोसायटी, शाखा लोहारा च्या नमुद व्यवस्थापकीय मंडळ दि. 27.02.2018 रोजी सोसायटी कार्यालयास कुलूपबंद करुन निघुन गेले. अशा मजकुराच्या विठ्ठल कोकरे यांनी न्यायालयात दिलेल्या फिर्यादीवरुन वरील संबंधीतांवर गुन्हा दि. 02.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments