Header Ads

“ऑटो रीक्षात देशी दारुची अवैध वाहतुक गुन्हा दाखल.”


स्थानिक गुन्हे शाखा: गोपनीय माहितीच्या आधारे स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, स्था.गु.शा. चे पोउपनि- श्री. आण्णाराव खोडेवाड, पोहेकॉ- खोत, पोकॉ- ठाकुर, मरल्लापल्ले यांच्या पथकाने दि.31.03.2020 रोजी 13.00 वा. सु. मौजे अंबेहोळ, ता.उस्मानाबाद येथील बसस्थानक जवळ छापा टाकला असता 1) बालाजी सुरेश गायकवाड 2)शशीकांत शंकर गायकवाड दोघे रा. अंबेहोळ, ता.उस्मानाबाद 3)सागर बारगुळे 4)गणेश शिंदे दोघे रा.नारी, ता.बार्शी हे चौघे ऑटो रीक्षामध्ये एका पोत्यात देशी दरुच्या 103 बाटल्या किं.अं. 5,356/- रु. च्या माल अवैध रित्या वाहुन नेताना आढळले. यावरुन वरील चौघांविरुध्द पो.ठा. उस्मानाबाद (ग्रामीण) येथे गुन्हा दि. 31.03.2020 रोजी नोदंवण्यात आला आहे.  

अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाई.
1) दैवशाला नाना काळे रा. चांदवाड, ता. भुम या दि. 31.03.2020 रोजी मौजे चांदवड शिवारात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करत असतांना 200 ली. गावठी दारु तयार करण्याचा द्रव पदार्थ व 30 ली. गावठी दारु एकत्रीत कि.अं. 23,035/-रु.च्या मालासह पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळुन आल्या. यावरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 31.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
2) सचिन लक्ष्मण क्षिरसागर रा. काक्रंबा, ता. तुळजापूर हे दि. 31.03.2020 रोजी शिवाजीनगर, काक्रंबा येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करत असतांना विदेशी दारुच्या 15 बाटल्या कि.अं. 2,100/-रु.च्या मालासह पो.ठा. तुळजापूर यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 31.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments