अबब ... कळंबमध्ये स्टेट बँकेसमोर एक किलोमीटर रांग ( Video )कळंब - कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून एकीकडे शासन, प्रशासन प्रयत्न करीत आहे वारंवार घरात राहण्याचे आवाहन करत आहे. मात्र लोक ऐकायचं नाव घेत नाहीयेत.उस्मानाबाद जिल्ह्यात देखील  अशीच परिस्थिती असून लोकांनी विशेतः महिलांनी  बँका समोर मोठी गर्दी केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर,लोकांनी आज खूप मोठी गर्दी केली आहे.  यातील बहुतांश महिला या आपल्या जनधन योजनेतील अकाउंटवर आलेले ५०० ते एक हजार रुपये  काढण्यासाठी आलेल्या होत्या,या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांसह, प्रशासन देखील प्रयत्न करताना दिसून आले, जवळपास एक किमी एवढी लांब लाईन यावेळी पाहायला मिळाली,  गर्दीला  आवर घालण्यासाठी महिला पोलिसानी  बँकेतील  ५०० रुपये काढण्यासाठी आलेल्या महिलांना काठीचा प्रसाद दिला. जर आम्ही बँकेत यायचं नाही तर खायचं काय असा सवाल या लोकांनी उपस्थित केलाय.


No comments