Header Ads

“पाच ट्रॅक्टर- ट्रेलर मधुन प्रवासी वाहतूक, गुन्हा दाखल.”पो.ठा. कळंब: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर असुन दि. 14.04.2020 पर्यंत लॉकडाउनचा आदेश झाला आहे. असे असतांनाही बाहेर गावी राहणारे अनेक लोक मिळेल त्या साधनाने, लपून-छपून, पायी चालत आपल्या गावी परत येत आहेत. यातुन कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील टाकळी साखर कारखाना येथून सोनपेठ जि. परभणी कडे पाच ट्रॅक्टर- ट्रेलर मधून आडवाटेने प्रवास करत जात असणाऱ्या 42 स्त्री, पुरुष, मुले यांना कळंब पोलीसांनी दि. 05.04.2020 रोजी 10.45 वा. सु. कळंब शिवारातील सात्रा फाटा येथे ताब्यात घेउन त्यांची रवानगी जि.प. शाळा, कळंब येथे महसुल प्रशासनाने उभारलेल्या तात्पुरत्या निवारा गृहात केली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी आरोग्य विभागा मार्फत करुन घेण्यात आली आहे. या पाचही ट्रॅक्टरचे चालक 1)प्रदिप भालेराव 2) श्रीकृष्ण भालेराव 3)मारुती देवकते 4) मधुकर देवकते 5)संदीप भोलेकर सर्व रा. सोनपेठ, ता.परभणी यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम-188, 269 अन्वये गुन्हा दि. 05.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments