Header Ads

संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारी वाहने जप्त.


पोलीस ठाणे, कळंब: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी दि. 14.04.2020 पर्यंत लॉकडाउनचा सरकारी आदेश झाला आहे. असे असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने कळंब पो.ठा. च्या पथकाने पो.ठा. हद्दीतून विनाकारण वाहने घेउन फिरणाऱ्या 27 मोटारसायकली ताब्यात घेउन पोलीस ठाणे येथे जमा केल्या आहेत. संचार बंदी संपताच त्या मुळ मालकास परत करण्यात येतील. नागरीकांनी विनाकारण घरा बाहेर पडून लॉकडाउनच्या उद्देशाला हरताळ फासु नये असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांनी केले आहे.

No comments