Header Ads

मारहाण : 3 गुन्हे दाखल... चोरी : 3 गुन्हे दाखल


पोलीस ठाणे, उमरगा: सुशिलाबाई राम धायगुडे रा. कासारसिर्सी, ता.निलंगा या व त्यांची तीन मुले दि. 01.04.2020 रोजी 11.00 वा. सु. मौजे दुधनाळ येथील त्यांच्या शेतात काम करत होते. यावेळी शेत शेजारी राजु गुलाब माने, संजु गुलाब माने, विश्वंभर गुलाव माने सर्व रा. दुधनाळ यांनी शेतबांधाचा वाद उकरुन काढून सुशिलाबाई धायगुडे व त्याची तीन मुले यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, हंटरने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुशिलाबाई धायगुडे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 01.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, उमरगा: महेश शिवाजी लादे रा. एकुरगा, जा.उमरगा हे दि. 01.04.2020 रोजी एकुरगा येथील त्यांच्या शेतात घरा जवळ ट्रॅक्टरने मुरुम टाकत होते. यावेळी भाउबंद दत्ता गणपती लादे, वैभव संगाप्पा लादे, संगाप्पा गणपती लादे यांनी ट्रॅक्टर नेन्यास आडवणूक करुन महेश लादे यांना शिवीगाळ करुन, धक्काबुक्की, विळ्याने वार करुन जखमी केले. भांडणे सोडवण्यास आलेल्या महेश यांच्या आई- वडीलांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महेश लादे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 01.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रामीण): निळुबा भाउ देडे रा. घाटंग्री, ता.उस्मानाबाद याने दि. 31.03.2020 रोजी 16.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घरी वडील- भाउ देविदास देडे यांनी त्यांच्या पत्नीस जेवन वाढण्यास सांगीतले. यावरुन निळुबा देडे याने आईला त्रास का देता असे धमकावून भाउ देडे यांना शिवीगाळ करुन, काठीने मारहण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भाउ देडे यांच्या फिर्यादीवरुन निळुबा देडे यांच्याविरुध्द गुन्हा दि. 01.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

चोरी.”
पोलीस ठाणे, आनंदनगर: दिपक सोपान जाधव रा. बार्शी नाका, उस्मानाबाद यांनी सांजा रोड, उस्मानाबाद येथील कुलकर्णी इंधन पंपा समोर दि. 24.03.202 ते 01.04.2020 दरम्यान लावलेल्या टिप्पर क्र. एम.एच. 25 टी 4111 च्या डिझेलच्या टाकीचा लॉक अज्ञात चोरट्याने तोडून 150 ली. डिझेल 9,970/- रु. किंमतीचे चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या दिपक जाधव यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 01.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी: बाळासाहेब दत्तु लाकाळ रा. पळसप, ता.उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने दि. 02.04.2020 रोजी 02.00 वा. सु. घरात प्रवेश करुन कपाटातील रोख 35,000/- रु., तीन मोबाईल फोन, दोन मनगटी घड्याळ एकत्रीत किं.अं 16,800/- रु. च असा एकुण 51,800/- रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या बाळासाहेब लाकाळ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments