Header Ads

संचारबंदीचे उल्लंघन, मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, 10 गुन्हे दाखल


उस्मानाबाद जिल्हा: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, आस्थापना बंदचा- लॉकडाउनचा आदेश आहे.
               उस्मानाबाद जिल्ह्यात दि. 03.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)ज्ञानेश्वर महादेव काळे रा.माडज, ता.उमरगा 2)देविदास चंद्रकांत कटारे रा.सारोळा, ता.उस्मानाबाद 3)अभिजीत रामलिंग तोडकरे 4)सुजित दत्तात्रय पवार दोघे रा.येडशी, ता.उस्मानाबाद 5)लक्ष्मण शिंदे 6)अमोल बबन जाधव दोघे रा. कळंब 7)आकाश नंदकुमार मुंढे रा.उस्मानाबाद, तर ग्राहकांची गर्दी भाजी विक्री ठिकाणी होउ देणारे 8)लक्ष्मी बाळु चांदणे रा. बँक कॉलनी, उस्मानाबाद, या सर्वांविरुध्द दि. 03.04.2020 रोजी भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये स्वतंत्र 7 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 03.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

तर आज दि.04.04.2020 रोजी जनता कर्फ्यु अंमलात असतांनाही 1)प्रविण घावटे रा.बार्शी 2)विश्वनाथ अभिमान कसबे रा.वाघोली, ता.उस्मानाबाद 3)इलाही गफुर शेख 4)सद्दाम खलील शेख दोघे रा.कुक्कडगाव, ता.परंडा हे सर्व मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरले. या वरुन अशा एकुण 4 व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 04.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

जुगार अड्ड्यावर छापा.”

पोलीस ठाणे, ढोकी: अंकुश उत्तम परसे, सलिम गनी शेख, किशन दत्तात्रय तावरे, रियाज फैजाय काझी, लतीफ सलिम कुरेशी, बंकट कमलाकर परसे, अब्रार सज्जाद शेख, सर्व रा. ढोकी, ता.उस्मानाबाद हे सर्व दि. 03.04.2020 रोजी वखारवाडी शिवारात तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व रोख रक्कम एकत्रीत 11,500/- रु. च्या मालासह पो.ठा. ढोकी यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. ढोकी येथे गुन्हा दि. 03.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments