“संचारबंदीचे उल्लंघन 2 व्यक्तींना प्रत्येकी तीन हजार दंड.”
पो.ठा. तुळजापूर:  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी पो.ठा. तुळजापूर गु.र.क्र. 126 व 143  /2020 या दोन दाखल गुन्ह्यातील 2 व्यक्तींना संचारबंदी जाहीर असतांनाही संचार बंदीचे उल्लंघन करणे, लोकसेवकाच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करणे. या प्रकरणी भा.दं.वि. कलम- 188, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (अ) च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून प्रत्येकी 3,000/- रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.

संचारबंदीचे उल्लंघन, दुकाने- आस्थापना उघड्या ठेवल्या 8 गुन्हे दाखल.
उस्मानाबाद जिल्हा:  उस्मानाबाद जिल्ह्यात दि.08.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)अनिल सिद्राम जाधव रा. नळदुर्ग, ता.तुळजापूर 2)नशपाक मकुदम फुलारी रा. केशेगांव, ता.तुळजापूर, तर शासनाच्या आदेशाचे अल्लंघन करुन येरमाळा येथे कापड दुकान उघडे ठेवेणारे 3)अरेफ जब्बार तांबोळी रा. येरमाळा व 4)करण अर्जुन मोरे यांनी येरमाळा येथील त्यांचे केश कर्तनालय उघडे ठेउन 5)वाहेद सईद सय्यद  यांचे केश कर्तन करीत होते. तसेच मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अवज्ञा करुन उस्मानाबाद शहरात फळ विक्री करणाऱ्या 6)आशा राजेश सोनवणे रा. दत्तनगर, उस्मानाबाद या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये स्वतंत्र 5 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 08.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
तर मा.जिल्हाधिकारी यांनी किराणा दुकाने चालू ठेवण्याची निश्चित केलेली वेळ 07.00 ते 11.00 वा. पर्यंत असतांनाही  दि.09.04.2020 रोजी मोमीन गल्ली, परंडा येथे किराणा दुकान उघडे ठेवणारे तीघे 1)बिलाल हन्नुरे मोमीन गल्ली, परंडा 2)राजाराम लोमटे 3)राहुल तरकसे  दोघे रा. सलगरा (दी.), ता.तुळजापूर व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 09.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारी 214 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश झाला असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जपतीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार काल दि. 08.04.2020 रोजी उस्मानाबाद (श.)- 6, उस्मानाबाद (ग्रा.)- 3, तुळजापूर- 40, तामलवाडी- 2, नळदुर्ग- 1, लोहारा- 2, कळंब- 7, येरमाळा- 1, भुम- 5, वाशी- 13, शहर वाहतुक शाखा- 47 अशी एकुण 127 वाहने ताब्यात घेतली आहेत.
तर आज दि. 09.04.2020 रोजी संपुर्ण जिल्ह्यात एकुण 56 वाहने (वृत्त लिहीपर्यत) ताब्यात घेतली असुन उर्वरीत कारवाई सुरु आहे.

No comments