Header Ads

संचारबंदीचे उल्लंघन तीघांना प्रत्येकी 1,000/-रु. दंडपो.ठा. तामलवाडी: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर असतांनाही संचार बंदीचे उल्लंघन करुन फिरणाऱ्या- दुकान उघडे ठेवणाऱ्या 1)लक्ष्मण शिवाजी सगर 2)सचिन बाळासाहेब पाटील 3)गुरुनाथ सोमनाप्पा कोंडे तीघे रा.तामलवाडी, 4)संतोष नागनाथ गायकवाड रा.धोत्रा 5)नाना वसंत मोरे उर्फ पांडुरंग रा.गंजेवाडी, ता.तुळजापूर या पाच व्यक्तींना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी लोकसेवकाच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी भा.दं.वि. कलम- 188 च्या 5 स्वतंत्र गुन्ह्यांत दोषी ठरवून प्रत्येकी 1,000/- रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.


 दुकाने उघडी ठेवली 18 गुन्हे दाखल.
उस्मानाबाद जिल्हा: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, आस्थापना बंदचा- लॉकडाउनचा आदेश आहे. असे असतांनाही दि. 02.04.2020 रोजी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा धोका होईल असे कृत्य करुन फिरत असणारे 1)मुस्तफा लायक तांबोळी 2)अकबर मोहियोद्दीन शेख 3)सुरेश शेषेराव कामटे 4)गणेश हरी गुजरे 5)प्रविण सारंग जाधव 6)उल्लाउद्दीन रसुल बागवान 7)शेख सोहेद उल्ताफ सर्व रा. उस्मानाबाद 8)दिपक सेपान खंडागळे रा.जुनोनी, ता.उस्मानाबाद 9)सागर शाहु बेंद्रे 10)अलिश्वर रावण सुरवसे दोघे रा.येडशी, ता.उस्मानाबाद 11)संदीप नेताजी जाधव रा.चिलवडी, ता.उस्मानाबाद 12)धनाजी दत्तु सुरवसे रा.खेड, ता.उस्मानाबाद 13)वसिम हैदरअली मोगले रा.मुरुम, ता.उमरगा 14)अजित सतीश तेलंग 15)ज्ञानेश्वर वाल्मीक बोयणे 16) मंथन राम पोतदार 17)वाजीद मशाक कार्ले चौघे रा.उमरगा 18)नवनाथ रामराव गायकवाड रा.गुंजोटी 19)अभिजीत नाथ जाधव रा.तुरोरी 20)सुधाकर ढवरु राठोड रा.उमरगा, 21)अभिषेक सुरेश गोरे रा.उस्मानाबाद याने आदेश झुगारून त्याच्या ताब्यातील ‘तेरणा हेअर सलून’ दुकान उघडे ठेवले, 22)लक्ष्मीकांत रटकळ 23)इब्राहीम बाबु नदाफ 24)बसवराज बिराजदार 25)प्रदिप गायकवाड चौघे रा. मुरुम, ता.उमरगा यांनी सिमेंट दुकान उघडे ठेउन सिमेंट विक्री करुन वाहुन नेले 26)चेतन डमरे 27)अमोल चौधरी दोघे रा.बार्शी यांनी नाका तोंडास मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरले. अशा एकुण 27 व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम क्र. 11  अन्वये स्वतंत्र 18 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 02.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


ग्राहकांची गर्दी- दुकान चालकावर गुन्हे दाखल.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रामीण): संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने शासनाने दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करुन 1)प्रमोद एकनाथ यादव 2)खाजाबाई रजबु नाईकवाडी दोघे रा. देवळाली, ता.उस्मानाबाद यांनी दि.02.04.2020 रोजी 11.00 ते 12.00 वा. चे दरम्यान देवळाजी येथील आपापल्या किराणा दुकानात नाका- तोंडास मास्क न लावता, दुकानात आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सुरक्षीत अंतरावर उभे न करता, त्यांना हात धुन्याची सुविधा न ठेवता दुकानात बोलावून गर्दी करुन कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन वरील दोघांविरुध्द भा.द.वि. कलम- 188, 269 अन्वये पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) येथे स्वतंत्र 2 गुन्हे दि. 02.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारी 78 वाहने जप्त.”
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश झाला असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या अशा वाहनांच्या जपतीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार आज दि. 03.04.2020 रोजी तुळजापूर पो.ठा.- 55 वाहने, कळंब पो.ठा.- 11  वाहने, शहर वाहतुक शाखेने- 12 वाहने अशी एकुण 78 वाहने जप्त केली असुन उर्वरीत कारवाई सुरु आहे. सदर वाहने संचार बंदी संपताच मुळ मालकास परत करण्यात येतील.
ही वाहन जप्तीची कारवाई लॉकडाउन असे पर्यंत दररोज केली जाणार आहे. नागरीकांनी विनाकारण घरा बाहेर पडून लॉकडाउनच्या उद्देशाला हरताळ फासु नये असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांनी केले आहे.

No comments