Header Ads

लॉकडाउन असतांना विनाकारण रस्त्यावर फिरणारी 273 वाहने जप्त


उस्मानाबाद : लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्‍तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 13.04.2020 रोजी उस्मानाबाद (श.)- 41, उस्मानाबाद (ग्रा.)- 18, तुळजापूर- 58, नळदुर्ग- 8, शिराढोण- 15, कळंब- 61, शहर वाहतुक शाखा- 72, अशी एकुण 273 वाहने ताब्यात घेतली आहेत.

आदेशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी वावर, दुकाने-  8 गुन्हे दाखल
उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यात दि.13.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)श्रीकांत रविंद्र पोतदार रा. अणदुर, ता.तुळजापूर, तर मा.जिल्हाधिकारी यांनी किराणा दुकाने चालू ठेवण्याची निश्चित केलेली वेळ 07.00 ते 11.00 वा. पर्यंत असतांनाही या वेळे व्यतीरीक्त किराणा दुकान चालू ठेवणारे 2)अविनाश जगन्नाथ वाघमारे 3)शारदा वाघमारे दोघे रा. कळंब, तसेच शासनाच्या आदेशाचे अल्लंघन करुन नळदुर्ग येथे फुटवेअर, जनरल स्टोअर्स, ऑटोमोबाईल दुकान उघडे ठेवणारे अनुक्रमे 4)राजेंद्र बाबुराव कांबळे 5)मुकुंद जगन्नाथ कुलकर्णी 6)समीर शुकुर कुरेशी तीघे रा. नळदुर्ग, ता.तुळजापूर, तर मौजे आंदोरा येथे चिकन दुकान उघडे ठेवणारे 7)महेबुब हिमोद्दीन पठाण रा. आंदोना, ता.कळंब या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 6 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 13.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

तर आज दि.14.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)मारुती बाळाप्पा सोनटक्के रा. व्होटगी, ता.सोलापूर (द.) 2)नागनाथ चरणाप्पा घोडके रा. काटगाव, ता.तुळजापूर अशा 2 व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. नळदुर्ग येथे दि. 14.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments