Header Ads

संचारबंदी उल्लंघन, 237 गुन्हे दाखल, 33 हजार दंड


उस्मानाबाद जिल्हा: कोरोना (कोविड-19) या संसर्गजन्य आजारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने दि. 22.03.2020 पासून लॉकडाउन- संचारबंदी अंमलात आहे. या काळात संचारबंदी उल्लंघन, दुकाने- आस्थापना उघड्या ठेवणे, तोंडास मास्क न लावणे अशा स्वरुपाचे कृत्य करणाऱ्या इसमांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, कोविड- 19 उपाय योजना नियम 2020- नियम 11, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब), साथीचे रोग नियंत्रण कायदा, अशा विविध कायदा- नियम अंतर्गत दि. 10.04.2020 पर्यंत एकुण 237 गुन्हे उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. त्या पैकी 14 गुन्ह्यांत आरोपींना एकुण 33,000/- रु. दंड शिक्षा मा. न्यायालयाने सुनावली आहे. सध्या न्यायालये पुर्ण क्षमतेने सुरु नसल्याने उर्वरीत गुन्हे हे न्यायप्रविष्ठ आहेत. ते गुन्हे सुनावनीस येताच त्या गुन्ह्यांतही आरोपींस कठोर शिक्षा व्हावी असा प्रयत्न सरकार पक्षा तर्फे केला जाणार आहे.
           लॉकडाउन- संचारबंदी सुरु असे पर्यंत अशा कारवाया पोलीस विभागा मार्फत केल्या जाणार आहेत. तरी जनतेने शासन आदेशांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी केले आहे.

No comments