निराश्रीत महिलेची रवानगी निवारा गृहात

 
निराश्रीत महिलेची रवानगी निवारा गृहात


उस्मानाबाद - लॉकडाउन काळात प्रवासी साधने उपलब्ध नसल्याने एक गतीमंद निराश्रीत महिला तीच्या नऊ महिन्याच्या मुलीसह उस्मानाबाद बसस्थानकावर आसरा घेउन थांबली होती.पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी हि माहिती महिला तक्रार निवार कक्ष (भरोसा सेल) ला कळवून प्रकरणाची खात्री करण्यास सांगितले.

 यावर दि. 05.04.2020 रोजी 19.00 वा. सु महिला तक्रार निवार कक्ष (भरोसा सेल) च्या सहाय्यक पोउपनि श्रीमती माया पानसे, महिला पोना- सीमा गाढवे, पोहेकॉ- शिंगाडे, शेंदारकर, टिके यांनी बसस्थानकावर जाउन त्या महिलेची चौकशी केली. या महिले समवेत तीची अंदाजे नऊ महिन्याची मुलगी असुन ती महिला पंढरपूर येथे जायचे आहे असे असंबंध्द बोलत होती. महिला पोलीस पथकाने त्या महिलेला जिवनावश्यक वस्तु पुरवून उस्मानाबाद, तहसिलदार  गणेश माळी यांच्याशी संपर्क साधला. उस्मानाबाद नगरपरिषद कर्मचारी व महसुल प्रशासन कर्मचारी यांच्या सहायाने त्या महिलेची रवानगी घाटंग्री आश्रम शाळा येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या निवारा गृहात केली आहे.

From around the web