Header Ads

“मारहाण, 4 गुन्हे दाखल.”


पोलीस ठाणे, भुम: रामा  आश्रुबा जायभाय, चंद्रभागा जायभाय दोघे रा. जयवंतनगर, भुम यांनी दि. 13.04.2020 रोजी 08.45 वा. सु. जयवंतनगर येथे पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन भाउबंद- लक्ष्मण आश्रुबा जायभाय व त्यांची पत्नी- रेखा जायभाय यांना शिवीगाळ करुन, काठीने मारहाण केली. तसेच रामा जायभायने लक्ष्मण यांच्या डोक्यात विळ्याने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या लक्ष्मण जायभाय यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 14.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (शहर): सचिन प्रकाश माळाळे रा. भिमनगर, उस्मानाबाद यांनी दि. 14.04.2020 रोजी 13.30 वा. सु. राहत्या घरी चटणीचे पाकीट फोडून न दिल्याच्या कारणावरुन पत्नी- सुरेखा माळाळे यांना चाकुने डोक्यात, हातावर वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुरेखा माळाळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन पती- सचिन माळाळे यांच्याविरुध्द गुन्हा दि. 14.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, लोहारा: महेश शिवाजी कांबळे रा. होळी, ता. लोहारा यांना व त्यांच्या कुटूंबीयांना दि. 14.04.2020 रोजी 20.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घरा समोर पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून गावातीच- युवराज धनराज गायकवाड, आजय मोरे, सरोजा गायकवाड यांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच महेश कांबळे यांच्या घरावर दगड फेकून घरा समोर लावलेल्या चार चाकीच्या काचा दगडाने फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या महेश कांबळे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 15.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

 पोलीस ठाणे, बेंबळी: बाबासाहेब मनोहर शिंदे, मनोहर शिंदे, श्रीकांत शिंदे सर्व रा. वाडीबामणी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 19.03.2020 रोजी 20.00 वा. सु. भाउबंद- तुकाराम मारुती शिंदे यांना त्यांच्या राहत्या घरा समोर शेतजमीन खरेदी- विक्री व्यवहाराच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. त्यात तुकाराम शिंदे यांचा हात मोडला. अशा मजकुराच्या तुकाराम शिंदे यांच्या फिर्यादीवरुन वरील ओरोपींविरुध्द गुन्हा दि. 15.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments