Header Ads

राहुल कुलकर्णी होम क्वारंटाईनउस्मानाबाद - फेक न्यूज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एबीपी माझाचा रिपोर्टर राहुल कुलकर्णी यास न्यायालयाने जामीन देताना, त्याच्या फेक न्यूजवर कडक ताशेरे ओढले आहेत, तसेच १५ दिवस होम क्वारंटाईन होण्यास बजावले आहे. 

उस्मानाबादेत बसून अनेक फेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी याची रेल्वे संदर्भात देण्यात आलेली फेक न्यूज अंगलट आली. वांद्रे पोलिसांनी राहुल कुलकर्णी यास बुधवारी फेक न्यूज प्रकरणी बुधवारी सकाळी अटक केली होती. त्यानंतर त्यास गुरुवारी न्यायालयात उभे करण्यात आल्यानंतर न्यायालयाने  राहुल कुलकर्णीच्या फेक न्यूजवर कडक ताशेरे ओढले तसेच  १५ दिवस होम क्वारंटाईन होण्यास बजावले आहे. 

आरोपी राहुल कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी सुनावताना बांद्रा कोर्टाने आपल्या आदेशात नोंदवलेले मुद्दे. 1)आरोपीची बातमी संभ्रम पसरवणारी होती. 2)आरोपीने ब्रेकींग न्युजसाठी बेजबाबदारपणे वृत्तांकन केले. 3)साथीच्या रोगासारख्या परिस्थितीत आरोपीने जबाबदारपणे कर्तव्य पार पाडले नाही. 4)माध्यमे जनतेला प्रभावी करु शकतात. 5)अशा घटना रोखण्यासाठी पोलीसांनी केलेली कारवाई योग्य आहे. 6)आरोपीचे कृत्य ऑनलाईन उपलब्ध आहे. 7)आरोपीला 30 एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात येत आहे. आरोपीला मिळालेल्या सशर्त जामीन आदेशामधील मुद्दे. 1)आरोपीने त्याला डायबेटिस व रक्तदाबाचा विकार असल्याचे सांगितले आहे. आधीच तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. आरोपीला हाय रिस्क झोनमधून प्रवास करत आणल्याने त्याला अशा परिस्थितीत तुरुंगात ठेवण्याऐवजी खालील अटी शर्थींवर जामीन देऊन सोडण्यात येत आहे. 2)आरोपीला सध्या 15 हजार रुपयांच्या पर्सनल बाँडवर सोडण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर एका आठवड्याच्या आत आरोपीने 20 हजार रुपयांच्या शुअरटी बाँडची पुर्तता करावी. 3)आरोपीने जामीनावर सोडल्यावर 15 दिवसांकरता होम क्वारंटाईन व्हावे. 4)जामीनावर सुटल्यावर आरोपीने पुराव्यांशी छेडछाड करु नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये.
Posted by Sunil Dhepe on Saturday, April 18, 2020

No comments