Header Ads

संचारबंदीचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी वावर,रस्त्यावर वाहन लावले गुन्हे दाखल


उस्मानाबाद जिल्हा: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, आस्थापना बंदचा आदेश आहे. असे असतांनाही जिल्ह्यात विविध ठिकाणी दि. 01.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता नाका-तोंडास मास्क न लावता फिरत असणारे 1) रोशन राजेश बारकुल 2)संदीप माणिक उंबरदंड 3)आकाश प्रकाश बारकुल तीघे रा. येरमाळा 4)वसीन मोगले रा. मुरुम, ता.उमरगा 5)दिपक सोपान संकपाळ रा. उस्मानाबाद 6)सागर कुलकर्णी 7)प्रविण पवार दोघे रा. माळशीरस यांचे विरुध्द तर, संचारबंदी उल्लंघन करुन ऑटो रिक्षा रस्त्यावर आणणारे 6)संजय आश्रुबा देवगावकर 7)जावेद रफिक शेख दोघे रा.उस्मानाबाद या 7 व्यक्तींविरुध्द स्वतंत्र 5 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 02.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
            अशा प्रकारे संचारबंदी काळात शासकीय आदेशाचे उल्लंघन करणारे, रस्त्यावर विनाकारण भटकणारे, मास्क न लावणारे, अत्यावश्यक सेवा वगळून दुकाने- आस्थापना उघडे ठेवणाऱ्या व्यक्तींविरुध्द एकुण 117 गुन्हे आज पर्यंत पोलीस दलाने नोंदवले आहेत.

No comments