Header Ads

कोरोनामुळे या गरीब शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी

दोन एकर वांगी, दोन शेवगा अखेर दान 



परंडा -   कोरोनामुळे अनेक गोरगरीब शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळेच परंडा  तालुक्यातील  शेळगांव येथील एका गरीब शेतकऱ्याने  लागवड केलेली दोन एकर वांगी, दोन एकर शेवग्याच्या शेंगा शेतातच सडू लागल्या आहेत.

उस्मानाबाद जिल्हा हा नेहमी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. तरीही काही शेतकऱ्यांनी हार न मानता दुष्काळावर मात करत, कमी  पावसावर पिके घेतली आहेत. शेळगांव येथील बापू दिगंबर शेंडकर यांच्याकडे  पैशाची अडचण होती, नातेवाईक-मित्रमंडळी कडून हात उसने पैसे घेऊन शेतीची योग्य मशागत करून त्यांनी शेतात वांगी व शेवगा लावण्याचा निर्णय घेतला, वेगवेगळ्या महागड्या औषधांची फवारणी केली, खत घातले.कष्ट करून चांगले उत्पन्न आले.या उत्पन्नावर मोठ मोठी स्वप्न पाहिली,अखेर स्वप्न स्वप्नच ठरली .


कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आला. अजूनही ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढणार आहे.लॉक डाऊनमुळे आलेले पीक विक्री अभावी तसेच शेतात सडू लागले, त्यातच गेली तीन दिवस झाले रोज रात्री अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे,राहिले सहिले नुकसान होतं आहे.लाखो रुपयाचे नुकसान झाले, मूद्द्लदेखील मिळाली नाही. शेवटी उसने घेतलेले पैसे परत कसे करायचे हा प्रश्न सतावत आहे .तरी देखील मन घट करून  या शेतकऱ्याने गावातील लोकांना  मोफत वांगी व शेवग्याच्या शेंगा घेऊन जाण्याचे आवाहन केले.

बऱ्याच लोकांनी आवाहनाला प्रतिसाद दिला, अजूनही भरपूर वांगी आणि शेवगा शिल्लक आहे.सदर शेतकऱ्यांने प्रशासनाला आवाहन केले आहे की शेतातील वांगी व शेवग्याच्या शेंगा गरजू लोकांनपर्यंत मोफत पोहच करा.अनेक गोरगरीब लोकांवर तसेच स्थलांतरित लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या पोटासाठी माझ्या पिकांचा वापर झाला तरी मला समाधान आहे. 

No comments