Header Ads

बाहेर गावाहुन आलेल्यांची माहिती गोळा करण्याचे पोलीस पाटील यांना आदेशपोलीस मुख्यालय: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी दि. 14.04.2020 पर्यंत लॉकडाउनचा सरकारी आदेश झाला आहे. या काळात सर्व प्रवासी वाहतुक शासकीय आदेशाने बंद करण्यात आली आहे. असे असतांनाही बाहेर गावी शहरात राहणारे अनेक लोक मिळेल त्या साधनाने, लपून-छपून, पायी चालत आपल्या गावी परत येत आहेत. यातुन कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. अशा लोकांची माहिती प्रशासनास व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांस संबंधीत पो.ठा. मार्फत लेखी आदेश देण्यात आला आहे. दि. 15.03.2020 पासून बाहेर गावाहुन येउन आपल्या गावात राहणाऱ्या व्यक्तींची नावे, पत्ता, संपर्क क्रमांक यांची माहिती घेण्याचा व तसे करण्यास कुचराई, टाळाटाळ केल्यास संबंधीत गावच्या पोलीस पाटील यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पोलीस पाटील यांना देण्यात आलेला हा आदेश- नोटीस त्यांच्या विरुध्द पुरावा म्हणून वापरली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांनी आदेशाप्रमाणे माहिती गोळा करुन संबंधीत पो.ठा. येथे द्यावयाची आहे. असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांनी केले आहे.

No comments