मंत्री जितेंद्र आव्हाड विरुद्ध फेसबुक पोस्ट :उस्मानाबादेत  गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, ढोकी: उस्मानाबाद -राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध  फेसबुकवर  आक्षेपार्ह  मजकूर ( पोस्ट) टाकणाऱ्या उस्मानाबाद तालूक्यातील एका तरुणाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बालाजी बाबासाहेब ढेकणे, रा. कौडगांव, ता. उस्मानाबाद याने दि. 04.04.2020 ते 07.04.2020 या कालावधी दरम्यान त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन समाजात धार्मीक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज विघातक मजकुर टाकला. तसेच  मंत्री महाराष्ट्र राज्य,  जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकुर (पोस्ट) प्रसिध्द केला. अशा रितीने त्याने सामाजिक एकता व सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.

            यावरुन त्याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 153 (अ) (1) (अ), 505 (2) अन्वये गुन्हा दि. 08.04.2020 रोजी नोंदवण्यात आला असुन सायबर पो.ठा. मार्फत अधिक तपास केला जात आहे.

No comments