Header Ads

लपुन-छपून जाणाऱ्या स्थलांतरीतांची रवानगी क्वारंटाईन ईमारतीतउस्मानाबाद जिल्हा: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी दि. 14.04.2020 पर्यंत लॉकडाउनचा सरकारी आदेश झाला आहे. या काळात सर्व प्रवासी वाहतुक शासकीय आदेशाने बंद करण्यात आली आहे. असे असतांनाही बाहेर गावी शहरात राहणारे अनेक लोक मिळेल त्या साधनाने, लपून-छपून, पायी चालत आपल्या गावी परत येत आहेत. यातुन कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. या काळात अनेक लोक वाहनात लपून, पायी प्रवास करत आहेत. जिल्हा पोलीस दलाने जिल्हा भरात उघडलेल्या पोलीस चेक पोस्टवर व पोलीस गस्त पथकांद्वारे त्या प्रवासी लोकांना थांबवून विशेष वाहनाने नेउन आरोग्य विभागाद्वारे शाळा, ईमारती, यांत तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या क्वारंटाईन गृहात ठेवण्यात येत आहे. या क्वारंटाईन गृहातील व्यक्ती बाहेर जाउ नये या करीता तेथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच ज्या व्यक्तींना सरकारी क्वारंटाईन गृहात किंवा राहत्या घरीच राहन्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी घरा बाहेर पडू नये या करीता पोलीस पथक त्यांच्यावर वेळोवेळी देखरेख करत आहेत. क्वारंटाईनअसणाऱ्यांनी बाहेर पडू नये. असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांनी केले आहे.

No comments